Pune Baner Crime News | सुरक्षा रक्षकाला अडवून जबरी चोरी करणार्‍या चौघांना बाणेर पोलिसांनी केले जेरबंद

Pune Baner Crime News | Baner police arrest four people for stealing by blocking security guard

पुणे : Pune Baner Crime News |  सुरक्षा रक्षक आपल्या साथीदाराबरोबर पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आमचे बँकेचे कार्ड घेतले आहे, असे म्हणून झडती घेण्याच्या नावाखाली खिशातील ४० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणार्‍यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दिनेश बाळु मंडपे Dinesh Balu Mandape (वय ३३, रा. साई अपार्टमेंट मागे, आदर्शनगर, पिंपरी), रोहन रमेश सूर्यवंशी Rohan Ramesh Suryavanshi (वय ३१, रा. मिलिंद नगर, पिंपरी), लक्ष्मण कृष्णा वाल्हेकर Laxman Krishna Walhekar (वय ४६, रा. एम बिल्डिंग, आदर्शनगर, पिंपरी), संतोष राम कंपा (वय ३१, रा. छत्रपती हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी व त्यांचे कार्यालयामधील १२ एप्रिल रोजी पायी जात असताना सुतारवाडी येथे चौघे जण दुचाकीवरुन आले. आमचे बँकेचे कार्ड पडले होते, ते तुम्ही घेतले, आम्हाला तुमची झडती घेऊ द्या, असे म्हणून त्यांची जबरदस्तीने झडती घेतली. खिशातील त्यांच्या पगाराचे ४० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन ते पळून गेले होते. गावाला जाऊन आल्यानंतर त्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बाणेर पोलिसांनी घटनास्थळावरुन मिळालेले सीसीटीव्ही आणि त्याच्या व्यतिरिक्त ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन आरोपी निष्पन्न केले. मिलिंदनगर येथे त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून दोन स्कुटर जप्त केली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, गणेश् रायकर, पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, शरद राऊत, मराठे, भोईने, पवार यांनी केली आहे.

You may have missed