Pune Crime News | 60 वर्षाच्या सुनेने 80 वर्षाच्या सासुचा चाकूने हातावर, गळ्यावर वार करुन केला खुन; आंबेगाव बुद्रुक मधील घटना

Pune Crime News | 60-year-old daughter-in-law stabbed 80-year-old mother-in-law to death with a knife on her hand and neck; Incident in Ambegaon Budruk

पुणे : Pune Crime News |  घरगुती वादातून ६० वर्षाच्या सुनेने ८० वर्षाच्या सासुवर चाकूने गळ्यावर, हातावर, वार करुन तिचा खुन केल्याचा घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुनेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सुमन आण्णासाहेब शिंदे (वय ८०, रा. समृद्धी रेसिडेन्सी, एकता मित्र मंडळाचे जवळ, ,आंबेगाव बुद्रुक) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे. अनुपमा संजय शिंदे Anupama Sanjay Shinde (वय ६०) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील समद्धी रेसिडन्सी येथे मंगळवारी १२ मे रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबत पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन भिमाशंकर कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे परिसरातील तीन पिढ्या एकत्र राहतात. सासु सुमन शिंदे (वय ८०) यांची  ६० वर्षाची सुन अनुपमा शिंदे यांच्याशी नेहमी वादविवाद होत होत्या. अनुपमा शिंदे यांचे पती सेवानिवृत्त आहेत. त्यांचा मुलगा व सुन हेही काल घरात होते. सासु सुनेमध्ये काल पुन्हा वाद झाला. अनुपमा हिच्या सुनेने त्यांची भांडणे थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रागाच्या भरात अनुपमा हिने आपल्या सुनेला बेडरुममध्ये कोंडून बाहेरून कडी लावली. त्यानंतर सासुला हॉलमध्ये आणून तिच्यावर चाकूने हातावर, गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. बेडरुममध्ये कोंडल्याने त्यांनी आतून दरवाजा उघडण्यास सांगितले. पण, अनुपमा हिने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा त्यांच्या मुलाने पोलिसांना फोन करुन बेडरुममध्ये आईने कोंडले असून आजीवर वार केले आहेत, असे कळविले. सासुचा खुन केल्यानंतर अनुपमा शिंदे हिने स्वत: पोलिसांना फोन करुन आपण सासुला मारल्याचे सांगितले.

ही घटना समजताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुपमा शिंदे हिला ताब्यात घेतले़ पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तपास करीत आहेत.

You may have missed