Pune Crime News | बनावट कागदपत्रे तयार करुन लोहगाव येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुबोध रुणवालसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लोहगाव येथील जमिनीवर बेकायदेशीर पणे अतिक्रमण करुन बनावट कागदपत्रे तयार करुन ब्रीज वॉटर रियल्टी एलएल पी कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक सुबोध रुणवाल यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(FIR On Builder Subodh Runwal )

सुबोध सुभाष रुणवाल Subodh Subhash Runwal (रा. मुंबई), आशुतोष एन नवरे Ashutosh N Navare (रा. मुंबई), ल्युसी रॉय चौधरी (Lucy Roy Choudhury), एम बी अगरवाल MB Aggarwal Mumbai (सर्व रा. मुंबई) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत ब्रीज वॉटर रियल्टी एलएलपीच्या (Breeze Water Realty LLP) वतीने रणजित अशोक दरक (वय ४८, रा. कल्याणीनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रणजित दरक यांनी लोहगाव येथील ३ हेक्टर जमिनीबाबत फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे केले होती. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संघटित गुन्हेगारी, फसवणूक, बनावटगिरी, अतिक्रमण, गुन्हेगारी कट रचणे इत्यादी कलम १११, ३१८ (२), ३२९(३), ३३३, ३३५, ३३६ (३), ३३८, ३४१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव येथील जमिनीतील वंडर प्रापर्टीज यांच्या मालकीच्या १०० टक्क्यांपैकी ८० टक्के हिस्सा फिर्यादी यांनी घेतलेला असून ही जागा त्यांच्या ताब्यात आहे. मुळ जमीन मालक उमाजी महादू बिडकर यांनी वंडर प्रॉपर्टीजचे मालक सतीश सत्यनारायण मित्तल यांना विकास करारनामा करुन ही जमीन दिली आहे. वंडर प्रॉपर्टीजने रुणवाल डेव्हलपर्स प्रा. लि. सोबत संयुक्त उद्यम करार केला. त्यात रुणवाल वंडर व्हेंचर्स या उपकंपनीत वंडर प्रॉपर्टीजला एकूण महसुलाच्या ५२ टक्के आणि रुणवाल डेव्हलपर्सला ४८ टक्के हिस्सा मिळणार होता.

१७ जानेवारी २०१६ रोजी सतीश मित्तल यांच्या निधनानंतर रुणवाल डेव्हलपर्सने सतीश मित्तल यांच्या वारसांच्या पूर्व लेखी संमतीशिवाय कोणत्याही तिसर्‍या पक्षाला कोणतेही हक्क हस्तांतरित करण्यास स्पष्ट मनाई होती.

रुणवाल डेव्हलपर्सने एका बनावट आणि मागील तारखेच्या अ-नोंदणीकृत दस्त द्वारे, जमीन हडप करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे हक्क त्यांच्या सिस्टर संस्थेला हस्तांतरित केले. जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी आयकर विवरणपत्रेही बनावट तयार केली.

सतीश मित्तल यांच्या कायदेशीर वारसांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या नोंदणीकृत हक्क हस्तांतरण दस्ताद्वारे त्यांचे ८० टक्के हक्क ब्रिज वॉटर रियल्टी एलएलपी यांना हस्तांतरित केले. ही मालमत्ता वास्तविक आणि प्रत्यक्ष फिर्यादी यांच्या ताब्यात आहे. सुबोध रुणवाल व इतरांनी स्थानिक गुंडाच्या मदतीने जबरदस्तीने वरील मालमत्तेत प्रवेश केला. त्याच्या प्रवेशद्वारावर बेकायदेशीरपणे एक फलक लावला. ज्यावर ही जमीन रुणवाल गटाची खाजगी मालमत्ता आहे आणि सर्व घुसखोरांवर भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ४२५, ४४१, ४४७ आणि ४४८ अन्वये खटला चालवला जाईल, असे लिहिले होते. 

फिर्यादी यांना फसविण्याच्या उद्देशाने मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा, जप्त करण्याचा आणि हडपण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता ब्रीज वॉटर रियल्टी एलएलपीने वरील मालमत्तेवर लावलेला फलक सुबोध रुणवाल व त्यांच्या एजंटांनी १३ मार्च २०२६ रोजी बेकायदेशीरपणे उखडून टाकला. त्यावर आपला फलक लावून अतिक्रमण केले. १४ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे पंचनामा नोंदवला होता. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन सुबोध रुणवाल व इतरांनी खोटी केस करुन आणखी खोटे आणि फसव्या केसेस दाखल करण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत आहेत.

You may have missed