Pune Crime News | विषारी दारु बळीचा तपास सीआयडीकडे; दापोडी, हडपसरमधील दोन्ही गुन्हे सीआयडीकडे केले वर्ग, बळींची संख्या 25 वर

Crime

पुणे : Pune Crime News | विषारी दारु पिल्याने फुगेवाडी आणि हडपसर परिसरातील जवळपास २५ जणांचा मृत्यु झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवुन देणार्‍या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण कडे सोपविण्यात आला आहे. याबाबत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आदेश काढला आहे.

फुगेवाडी येथे विषारी दारु पिल्याने एका पाठोपाठ एकाला उलट्या, चक्कर येणे हे प्रकार घडू लागले. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्य झाला. फुगेवाडी आणि हडपसर येथील बेकायदा दारु अड्ड्यावरुन हातभट्टीची दारु पिल्यामुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या २५ वर पोहचली आहे. या शिवाय किमान १० जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी दापोडी व हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले आहेत.

सीआयडीने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या घटनेमध्ये रविवारपर्यंत दापोडी परिसरातील ११ आणि हडपसर परिसरातील ४ जणांचा मृत्यु झाल्याचे सीआयडीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You may have missed