Pune Crime News | गोव्यावरून खरेदीसाठी आलेल्या दोघा तरुणांसह चौघांना पकडून वाघोली पोलिसांनी 4 पिस्टल, 15 जिवंत काडतुसे केली जप्त

Pune Crime News | Wagholi police caught four people, including two young men who came from Goa to buy, and seized 4 pistols and 15 live cartridges.

पुणे : Pune Crime News | इंस्टाग्रामवरून झालेल्या व्यवहारानुसार पिस्टल खरेदी करण्यासाठी आलेल्या गोव्यातील दोघा तरुणांसह वाघोली पोलिसांनी चौघांना पकडून त्यांच्याकडून ४ पिस्टल व १५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

आकाश उर्फ गज्या अशोक मोरे  Aakash alias Gajya Ashok More (वय २१, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी), मनीष दिलीप फर्नाडीस Manish Dilip Fernandes (वय २६, रा. चांदोर, मडगाव, गोवा), चंद्रेश्वर माल्लेशी (वय २१, रा. चांदोर, मडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.  

वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस पथक केसनंद भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना बातमीदाराकडून  माहिती मिळाली की, जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रोडवर ३ ते ४ जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहेत. बातमी मिळाल्यावर पोलीस उप निरीक्षक शिवशंकर राघू व पोलीस अंमलदार यांनी तेथे जावून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ देशी बनावटीची पिस्टल, ४ मॅग्झीन व १५ जिवंत काडतुसे मिळाली. त्यांच्याकडून ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

आकाश मोरे याच्यावर या पूर्वी पिस्टल बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने इंस्टाग्रामवर पिस्टल विकण्याची पोस्ट टाकली होती. ती पाहून मनीष याने त्यांच्याशी संपर्क केला. त्यांचा व्यवहार ठरला. त्यानुसार हे पिस्टल घेण्यासाठी केसनंद येथे आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. आकाश याने हि पिस्टल मध्य प्रदेशातून आणली होती. वाघोली पोलिस  ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस उप निरीक्षक शिवशंकर राघू , पोलीस अंमलदार  प्रदीप मोटे, अशोक शेळके, महादेव कुंभार, मारुती वाघमारे, विशाल गायकवाड, मंगेश शेळके यांनी केली आहे.

You may have missed