Pune Crime News | धुलीवंदन कार्यक्रमात लिकर परवाना न देता 10 लाखांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन लिंकीन माईड कंपनीच्या कुणाल जैन यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | धुलीवंदन कार्यक्रमात लिकर स्टॉलसाठी पैसे घेऊन लिकरचा परवाना न देता ९ लाख ७६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन लिंकीन माईड कंपनीचे कुणाल जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राकेश कोन्दे जाजीमोग्गा (वय ३२, रा. बापदेवनगर, देहुरोड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुणाल जैन (वय ४०, रा. शाक्ला व्हिस्टा, उंड्री पिसोळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोली येथील मैफिल्ड, यश गार्डन येथे ३ मार्च २०२६ रोजी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश कोन्दे जाजीमोग्गा यांचा इव्हेंट करणे हा व्यवसाय असून त्यांची अशियन एडप्ट इव्हेंट अ‍ॅन्ड एंटरटेन्मेंट प्रा. लि. नावाने कंपनी आहे. कुणाल जैन यांच्या लिंकीन माईट टीमने ३ मार्च २०२६ रोजी वाघोलीतील मैफिल्ड यश गार्डन व आर्चीड हॉटेल बालेवाडी येथे धुलीवंदन कार्यक्रम ठेवलेला होता. या दोन्ही कार्यक्रमासाठी १० लाख २५ हजार रुपये फि ठरलेली होती. दोन लिकर लायसन्ससाठी ५६ हजार रुपये फि (चलन) ठरलेली होती. त्याप्रमाणे राकेश याने ९ लाख ३ हजार रुपये कुणाल जैन याला दिले. त्यांनी मैफिल्ड यश गार्डन येथे कलर स्टॉल व वॉटर स्टॉल, सिगारेट स्टॉल व दोन लिकर स्टॉल घेतलेले होते.

यासाठी त्यांनी लिकर लायसन्सचे २८ हजार रुपये दिले होते. लिकर लायसन्स काढण्याची जबाबदारी कुणाल जैन यांच्या लिंकीन माईड कंपनीची होती. त्यांनी कार्यक्रमाला १२ हजार पेक्षा जास्त जनसमुदाय येणार असे सांगितले होते़ परंतु, प्रत्यक्षात अंदाजे ७ हजार जनसमुदाय आलेला होता़ लिंकीन माईड कंपनीने सांगितल्याप्रमाणे तेथे गर्दी झाली नाही़. त्यांना एक्साईजचा परवाना मिळाला नाही. तसेच लिकरचा परवानाही नसल्याने त्यांचे त्या दिवशी नुकसान झालेले आहे. दोन लिकर स्टॉलसाठी त्यांनी ७ लाख रुपये दिलेले होते. लिकरचे स्टॉल बनविण्यासाठी ९० हजार रुपयांचा खर्च केला होता. कुणाल जैन यांच्या सांगण्यावरुन त्यांनी शंशाक व अश्पाक यांना पाणी, सोडा व कोल्डड्रींक असा १ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा माल दिलेला होता. कुणाल यांना लिकरचा परवाना न मिळाल्याने त्यांनी लिकरसाठी घेतलेले पैसे परत द्यावेत, यासाठी फिर्यादी यांनी वेळोवेळी फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन घेतले नाहीत. शेवटी त्यांनी वाघोली पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

You may have missed