Pune Crime News | तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन जातीची नसल्याच्या कारणावरुन लग्नास नकार देणार्‍या तरुणावर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल

Pune Crime News | A case of atrocity registered against a young man who sexually assaulted a young woman and refused to marry her because she was not of his caste

पुणे : Pune Crime News |  लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडिओ काढले. तिने लग्नाचे विचारल्यावर जातीची नाही, असे म्हणुन लग्नास नकार देणार्‍या नराधमावर पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका २२ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निलेश संजूकुमार राजिवाले Nilesh Sanjukumar Rajiwale (वय २६, रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, मोरया सोसायटी, वडमुखवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२५ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राजिवाले याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला जबरदस्तीने घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी तिच्या नकळत त्याने फोटो तसेच व्हिडिओ काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हाताने मारहाण करुन दमदाटी केली. तिने लग्नाबाबत विचारल्यावर तू आमच्या जातीची नसल्याने मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही, असे बोलून शिवीगाळ केली. सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर तपास करीत आहेत.

You may have missed