Pune Crime News | अपहरण़ खुनाचा प्रयत्नातील 9 वर्षांपासून फरारी असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने केले जेरबंद

Pune Crime News | A gangster who was absconding for 9 years in connection with an attempted kidnapping and murder was arrested by a team of Crime Branch Unit 6.

पुणे : Pune Crime News |  हडपसर परिसरात ९ वर्षांपूर्वी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. तो २०१७ पासून फरारी होता.

अमर बबन घाडगे Amar Baban Ghadge (वय २९, रा. दीपकनगर, गोपाळपट्टी, मांजरी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने अमोल आडेगावकर, मारुती गवळी व इतर साथीदारांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न केला होता.

शहरात ३० मे रोजी कोम्बिंग तसेच राऊंड अप ऑपरेशन असल्याने पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे युनिट ६ चे पथक गुन्हेगारांची माहिती काढत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना त्यांच्या बातमीदाराकडून ९ वर्षापासून फरारी आरोपी अमर घाडगे हा लक्ष्मी कॉलनी या ठिकाणी उभा आहे. त्याच्या हातावर payal पायल असे गोंदलेले आहे, अशी माहिती मिळाली. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन अमर घाडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, सतिश वनवे, समीर पांडुळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार, अनिल जामगे यांनी केली आहे.

You may have missed