Pune Crime News | ‘मला काही होत नाही, तू घरी जा’ असे म्हणणार्या तरुणाचा काही वेळाने अनैतिक संबंधातून झाला खुन; आंबेगाव पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | रस्त्यात बाचाबाची सुरु असल्याने आईने आपल्या मुलाला माझ्याबरोबर घरी चल असे सांगितले. त्यावर त्याने मला काही होत नाही, तु घरी जा, मी आलोच असे म्हणाला. त्यानंतर काही वेळातच अनैतिक संबंधावरुन झालेल्या वादावादीत तरुणाच्या डोक्यात मारहाण करुन त्याचा खुन करण्यात आला. आंबेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यावेळी त्याने आईचे ऐकले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते.
सिद्धांत संजय हातुरे Siddhant Sanjay Hature (वय ३६, रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव खुर्द आणि ऋषिकेश मनोहर गायकवाड Rishikesh Manohar Gaikwad (वय २९, रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दीपक अशोक क्षीरसागर (वय ३८, रा. समर्थ हाईटस, इंद्रायणीनगर, आंबेगाव खुर्द) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची बहिण कविता राहुल साठे (वय ३४, रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हा पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला होता. त्याचे गेल्या ३ वर्षांपासून एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. हे सर्वांना माहिती होते. सिद्धांत याचा दीपक व त्या मुलीच्या अनैतिक प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यातून सिद्धांत व दीपक यांच्यात बाचाबाची झालेली होती. परंतु, दीपक याने पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नव्हती.
फिर्यादी यांची आई मंदा क्षीरसागर यांना १० मे रोजी रात्री १० वाजता दत्तनगरवरुन आपल्या घरी जात असताना इंद्रायणी कमानीजवळ सिद्धांत व एक अनोळखी मुलासह दीपक याच्यासोबत बाचाबाची करुन शिवीगाळ करत होते. त्यावेळी त्यांनी दीपक याला माझ्यासोबत घरी चल, असे सांगितले. त्यावर त्याने मला काही होत नाही, तु घरी जा, मी आलोच, असे म्हणाला. त्याची आई गेल्यानंतर काही वेळातच दोघांनी दीपकच्या डोक्यात वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. आंबेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सजगणे तपास करीत आहेत.
