Pune Crime News | रेड लाइट एरियामधील 5 बांगला देशी महिलांवर कारवाई; 11 महिन्यांमध्ये 94 बांगला देशींवर कारवाई, अनेकांना केले डीपोर्ट
पुणे : Pune Crime News | बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये बांगला देशातून आलेल्या महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याच्या माहितीवरुन फरासखाना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करुन ५ बांगला देशी महिलांवर कारवाई केली. यापूर्वी माचिस बिल्डिंगवर कारवाई केली होती़ त्यानंतर आता पुन्हा याच बिल्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे.
सकीना खातुन (वय २६), मोनिका अल्ताफ शेख (वय २८), परवीन जोहरमुल्ला शेख (वय ३५), हबीब अब्दुल शेख (वय २४), इसरात जन्स सलमान शेख (वय २३, सर्व रा. बांगला देश) अशी कारवाई झालेल्या महिलांची नावे आहेत.
बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करुन बांगला देशी महिला व पुरुषांवर कारवाई केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना बांगला देशी महिलांचा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे याना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील माचिस बिल्डींग येथे ५ बांगला देशी माहिती रहात असून त्या वेश्या व्यवसाय करत आहेत. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी ११ मे रोजी रात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत रेड लाईट एरिया मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात ५ महिला बांगला देशी असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील अनेक इमारतींमध्ये बांगला देशी महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याचे वेळोवेळी केलेल्या कारवाईत आढळून आले आहे. याशिवाय काही बांगला देशी हे शहराच्या दुसर्या भागात रहात होते. अशांवरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात १३० बांगलादेशींची मायदेशी (डिपोर्ट) करण्यात आले आहे. .गेल्या ११ महिन्यात अशा ९४ बांगला देशी महिला व पुरुषांवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार बुधवार पेठेतून ताब्यात घेण्यात आलेल्या ५२ महिलांना बांगलादेशात पाठविण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार सुनिल मोरे, पोलीस हवालदार महेश राठोड, वशिम शेख, पोलीस हवालदार राणी शिंदे, पुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे, पोलीस अंमलदार वैभव कदम, रवींद्र बत्तीशे, करीष्मा कडाळे यांनी केली आहे.
