Pune Crime News | पुणे : गोखलेनगरमधून चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपीला पकडून 20 लाखांचा गुटखा केला जप्त (Video)
पुणे : Pune Crime News | गोखलेनगर येथे बेकायदेशीरपणे गुटख्याचा साठा करुन ठेवल्याच्या माहितीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी तरुणाला पकडून त्याच्याकडून टेम्पोसह २० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
अमर नंदु पन्हाळकर (वय ३७, रा. मारुती मंदिराजवळ, जनवाडी जनता वसाहत) असे आरोपीचे नाव आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथक गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदारांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोखलेनगर येथे बेकायदेशीरपणे गुटख्याचा साठा करुन त्याची विक्री करीत आहेत. या बातमीची खातरजमा करुन पोलिसांनी अमर पन्हाळकर याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १३ लाख ५१ हजार १५० रुपयांचा पानमसाला व तंबाखुजन्य गुटखा ६ लाख रुपयांचा टेम्पो असा १९ लाख ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. चतु:श्रृृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार इरफान मोमीन, बाबुलाल तांदळे, श्रीकांत वाघवले व शिर्के यांनी
