Pune Crime News | महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या तारा चोरणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने ८ गुन्हे उघडकीस आणून १२ लाख ७३ हजारांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणार्या आतंरराज्य टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील तिघांना पकडून पोलिसांनी ६ गुन्हे उघडकीस आणून १२ लाख ७३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
मोहम्मद साहेबजान मंगेरखान Mohammad Sahebjan Mangerkhan (वय ३०), आदर्श चंद्रप्रकाश पांडे Adarsh Chandraprakash Pandey (वय २२), चंद्रसेन शिवरतन धारिया Chandrasen Shivratan Dharia (वय २८, तिघे सध्या रा. गोटेमाळ, सासवड, जि. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.
पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, लोणीकंद परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हवेली तालुक्यातील वाडेगाव येथे काही ट्रान्सफॉर्मर चोरी करणारे चोरटे येणार आहेत. या माहितीची खातरजमा करुन पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून पाठलाग करुन एका संशयित मालवाहू टेम्पो व त्यातील तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी मागील ५ ते ६ महिन्यात लोणीकंद परिसरातील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस व हिंगणगाव येथून एकूण ८ ट्रान्सफॉर्मर, रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे कबुल केले. त्यांना ६ सप्टेंबर रोजी अटक करुन त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उर्किडे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, किरण पलांडे, नेहा तापकीर, बाळासाहेब तनपुरे, समाधान पाटील, भरत गुंडवाड, प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.
