Pune Crime News | इनोव्हा कार कमी किमंतीत घेऊन देण्याच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक केल्याचा वकिलावर आणखी एक गुन्हा दाखल; न्यायालयाने वकिलाला फरार घोषित करण्यासाठी काढली नोटीस
पुणे : Pune Crime News | इनोव्हा कार कमी किंमतीत घेऊन देण्याचे आमिष दाखवुन एका नागरिकाकडून १३ लाख ९७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याबाबत एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वकिलाने अनेकांची फसवणूक केली असून न्यायालयाने त्याला फरार घोषित करण्याची नोटीस बजावली आहे.
ऋषिकेश केशवर करवंदे Rishikesh Keshav Karvande (वय ४४, रा. मंदारबन सोसायटी, हिंगणे खुर्द) असे या वकिलाचे नाव आहे. याबाबत हेमंतकुमार केशवराव पवार (वय ५७, रा. शिवसागर सोसायटी, माणिकबाग, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंहगड रोड येथील गोयलगंगा सोसायटीजवळील चहाचे टपरीवर जून २०२५ ते ८ आँगस्ट २०२६ पर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश केशव करवंदे हे वकिल असून त्याने फिर्यादी यांना इनोव्हा गाडी कमीत कमी किंमती मध्ये घेऊन देण्याची बतावणी करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपी व नातेवाईक निलेश जगताप यांनी मिळून मृत्यु पावलेल्या आपल्या वडिलांच्या बँक खात्यावर फिर्यादी यांना १३ लाख ९७ हजार ९०० रुपये ट्रान्सफर करण्यास लावले. त्यांना कोणतीही कार ने देता तसेच पैसे परत न करता फसवणूक केली.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी यांनी सांगितले की, ऋषिकेश करवंदे याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याला फरार करण्याविषयी न्यायालयाने नोटीस काढली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
