Pune Crime News | अतिक्रमण विभागातील अधिकार्‍याला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या 9 जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खंडणी मागितल्याचा आरोप

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | महापालिका अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांना जातीवाचक शिवीगाळ करुन त्यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज करुन त्रास देण्याचा प्रकार घडला. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ऋषिकेश् अभिमान सावंत Hrishikesh Abhiman Sawant (रा. शाहु कॉलनी, सिंहगड रोड), सुनिल जयवंतराव पवार Sunil Jayawantrao Pawar (रा. भारती विहार, कात्रज), उमेर मैनुद्दीन शेख (Umer Mainuddin Shaikh), राजेंद्र विलास जाधव Rajendra Vilas Jadhav (रा. साई, दत्तनगर, तळजाई पठार, धनकवडी), रमेश विष्णु खामकर Ramesh Vishnu Khamkar (रा. नारायण पेठ), शंकर किन्नु ठाकूर Shankar Kinnu Thakur (रा. पर्वती दर्शन), मिलिंद जाधव, नागुबाई ऊर्फ मीनाताई सिद्धप्पा धोत्रे Nagubai alias Meenatai Siddappa Dhotre (रा. दीपबंगला चौक, शिवाजीनगर), कविता विनयकुमार पटेकर Kavita VinayKumar Patekar (रा. मांगडेवाडी, कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विभागीय अतिक्रमण अधिकार्‍यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पुणे महापालिकेच्या आवारामध्ये २७ मार्च २०२६ रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शासकीय कर्तव्य करत असताना ऋषिकेश सावंत याने फिर्यादी यांची अडवणुक करुन त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांना जातीवाचक शिवीगाळ व अपमान करुन तुझी नोकरीच खातो, अशी धमकी दिली. तसेच सुनिल पवार व इतरांनी त्यांचे हितसंबंध असलेल्या व्यक्तीचे रस्त्यावर असणार्‍या बेकायदेशीर स्टॉल्सवर अतिक्रमण विभागाची वारंवार कारवाई होऊ नये, म्हणून पुणे महानगर पालिकेमध्ये कार्यरत असणारे मागासवर्गीय अधिकारी यांना लक्ष्य करुन दबाव टाकून त्यांच्याविरोधात शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये खोट्या तक्रारी अर्ज केले आहेत. अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड यांच्याविरोधात दाखल केलेले सर्व तक्रारी अर्ज मागे घेऊ, पुन्हा त्यांच्या विरोधात तक्रारी अज करणार नाही, असे सांगून त्यांच्याकडे १० हजार रुपयांची खंडणीची मागणी केलेली आहे.

तसेच कविता पटेकर या दिव्यांग असल्याचा फायदा घेऊन मनपा भवनाच्या बाहेर वैयक्तिक कारणासाठी सतत अंदोलने करुन शासकीय कामात सतत अडथळा आणून अधिकारी व कर्मचारी यांची सोशल मीडियावर चुकीची बातमी प्रसिद्ध करुन बदनामी केली आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले तपास करीत आहेत.

You may have missed