Pune Crime News | दारू पिताना शिवीगाळ केल्याने सॉफ्टवेअर इंजिनियरच्या गळ्यावर कटरने वार करुन केला खुनाचा प्रयत्न, भाजी विक्रेत्याला अटक
पुणे : Pune Crime News | दारु पित असताना शिवीगाळ केल्याने भाजी विक्रेत्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या गळ्यावर वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. सहकारनगर पोलिसांनी भाजी विक्रेत्याला अटक केली आहे.
निशांत मुुकुंद पिसे (वय ४६, रा. सुवर्णा हाईटस, तळजाई पठार, धनकवडी) असे जखमीचे नाव आहे. त्यांचे वडिल मुकुंद त्र्यंबक पिसे (वय ७८) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समाधान प्रभु पवार Samadhan Prabhu Pawar (वय ४२, रा. नवजीवन मित्र मंडळ, आंबेगाव पठार) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना धनकवडी येथील गुलाबनगरमधील ढोणे देशी दारु दुकानासमोर २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत पिसे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. समाधन पवार यांचे भाजीचे दुकान आहे. ते दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. ते दारु पित असताना निशांत याने पवार याच्या पत्नीच्या नावाने शिवीगाळ केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा समाधान पवार याने त्याच्याकडील कटरने निशांत त्यांच्या गळ्यावर वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत निशांत पिसे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी समाधान पवार याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करीत आहेत.
महत्त्वाची संपादकीय टीप : सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.
