Pune Crime News | बनावट कागदपत्रे तयार करुन फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करुन घेऊन जीआयसी हाऊसिंग फायनान्सची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन स्कायलाईन डेव्हलपरच्या भागीदारासह 4 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | स्काय पार्क सोसायटीच्या मिळकतीचे खरेदी दस्त, डिमांड लेटर, इत्यादी बनावट कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे फायनान्स कंपनीमध्ये भासवून जी आय सी हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करुन घेऊन ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन स्कायलाईन डेव्हलपरचे भागीदार बाबासाहे कुटे यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जी आय सी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक संदीप सिद्धरामअप्पा बेलम (वय ३७, रा. विवा सरोवर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नंदु शिवराम जगताप Nandu Shivram Jagtap (वय ४२, रा. आराध्यम सोसायटी, दत्तनगर, डुडुळगाव, मोशी), स्कायलाईन डेव्हलपरचे भागीदार बाबासाहेब चंद्रकांत कुटे Babasaheb Chandrakant Kute (वय ४५, रा. मानाजीनगर, नर्‍हे रोड), निलेश दादाभाऊ बेंद्रे Nilesh Dadabhau Bendre (रा. यशवंतनगर, चंदननगर, खराडी), प्रसाद शिवशरण निरोळी Prasad Shivsharan Niroli (वय ३४, रा. संपदा रेसिडेन्सी, सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जी आय सी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या दिप बंगला चौक येथील कार्यालयात जुलै २०२६ पासून आजपर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदु जगताप यांनी जी आय सी हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये  कर्ज मंजुरी करीता अर्ज केला होता. स्काय पार्क सोसायटी येथील मिळकतीचे खरेदीखताचा ड्राफ्ट बँकेत आणून दिले होते. मुळ कागदपत्रे जमा केल्यावर त्यांनी स्कायलाईन डेव्हलपर्सचे अधिकृत प्रतिनिधी प्रसाद निरोळी हे डिमांड लेटर देतील असे सांगितले. ३७ लाख १३ हजार ३०३ रुपयांचा कर्जाचा चेक प्रसाद निरोळी यांच्याकडे देण्यात आला. त्यांचा चेक ११ ऑगस्ट २०२६ रोजी क्लीअर झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नंदु जगताप यांनी त्यांचे मित्रालाही कर्ज पाहिजे असल्याचे सांगून त्यांना घेऊन आले़ बँकेने त्यांची कागदपत्रांची पडताळणी केली.

तेव्हा त्यांना कागदपत्रांमध्ये संशय आल्याने त्यांनी खातरजमा केली. त्यात त्यांच्या प्रापॅर्टीवर दोन बँकांचे कर्ज असल्याचे दिसून आले. त्यावर त्यांनी नंदु जगताप यांच्या प्रॉपर्टीबाबत तपासणी केली असता जगताप यांनी स्कार्य पार्क सोसायटीतील मिळकतीवर जी आय सी फायनान्स बँकेप्रमाणे मिटकॉन फायनान्स कंपनी, निवारा फायनान्स बँक, मास हाऊसिंग फायनान्स, टु होम फायनान्स कंपनी या बँकेमध्ये या मिळकतीबाबत कागदपत्रे सादर करुन कर्ज मिळणेबाबत प्रकरण सादर केले होते. त्यामध्ये टु होम्स फायनान्स कंपनीकडून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे समजले. तसेच उर्वरित बँकाकडून कर्ज मंजूर केले होते. परंतु त्याचे डिसबर्समेंट थांबविले असल्याचे समजले आहे. जी आय सी फायनान्स कडून घेतलेल्या कर्ज रकमेबाबत त्यांनी माहिती घेतली असता निलेश बेंद्रे याचे  नावावर हे बँक खाते असल्याचे दिसून आले. बेंद्रे आणि स्काय लाईन डेव्हलपर यांचा काही एक संबंध नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या आरोपींनी संगनमत करुन स्कार्य पार्क सोसायटी या मिळकतीची खरेदी दस्त, डिमांड लेटर इत्यादी बनावट कागदपत्रे तयार करुन ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.

महत्त्वाची संपादकीय टीप : सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.

You may have missed