Pune Crime News | जाळपोळ करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने घरफोडीचे 9 आणि रिक्षा चोरीचे 5 गुन्हे आणले उघडकीस

Pune Crime News | Crime Branch Unit 5 team arrests inn arsonist, uncovers 9 cases of house burglary and 5 cases of rickshaw theft

पुणे : Pune Crime News | हडपसर येथील संविधान सोसायटी येथे अल्पवयीन मुलांनी त्यांच्या साथीदारासह पार्किंगमधील दुचाकी वाहने जाळणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले. त्याच्याकडील चौकशीत घरफोडीचे ९ आणि रिक्षा चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सोन्या ऊर्फ आयुष रवींद्र काळे Sonya alias Ayush Ravindra Kale (वय २४, रा. हिराबाग चौक, घोरपडे पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

हडपसरमधील संविधान सोसायटीतील दुचाकी वाहने अल्पवयीन मुलांना घेऊन १८ मे रोजी जाळण्यात आली होती. त्यातील आरोपींचा गुन्हे शाखा समांतर तपास करीत होते. युनिट ५ च्या पथकातील पोलीस अंमलदार विनोद शिवले व सुधीर सोनवणे यांना २० मे रोजी बातमी मिळाली. या बातमीवरुन पोलिसांनी सोन्या काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून वानवडी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. त्याचबरोबर वानवडी पोलीस ठाण्यातील रिक्षा चोरीचे २, घरफोडीचे २ गुन्हे, काळेपडळ पोलीस ठाण्याकडील रिक्षा चोरीचा १ गुन्हा, कोंढवा, येवलेवाडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा, लष्करचा घरफोडीचा, खडक पोलीस ठाण्याकडील रिक्षा चोरीचा १, विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील घरफोडीचे २ गुन्हे, अलंकारकडील १ घरफोडीचा गुन्हा, सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील १ घरफोडीचा, पर्वतीकडील १ वाहनचोरी व सहकारनगर पोलीस ठाण्याकडील रिक्षा चोरीचे ५ गुन्हे व ९ घरफोडीचे असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार विनोद शिवले, सुधीर सोनवणे, नेत्रिका अडसुळ, नासिर देशमुख, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, अमर चव्हाण, अकबर शेख, जयदेव भोसले, अविनाथ इंगळे, राहुल ढमढरे, परमेश्वर कदम, मयुरी पालवे यांनी केली आहे.

You may have missed