Pune Crime News | बनावट नोटांची डिलिव्हरी देण्यास आला अन् अडकला ! बनावट नोटा बनविणार्‍या टोळीला पकडून विश्रामबाग पोलिसांनी केला बनावट नोटांचा कारखाना उद्धवस्त (Video)

Pune Crime News | Came to deliver fake notes and got caught! Vishrambaug police caught a gang making fake notes and busted the fake note factory (Video)

500 रुपयांच्या साडेपाच लाखांच्या नोटांसह कलर प्रिंटर साहित्य जप्त

पुणे : Pune Crime News | गेल्या वर्षी पुण्यात बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न करताना पकडल्यानंतर आता त्याने पुन्हा तोच उद्योग सुरु केला. यावेळी त्याने आपल्या साथीदाराला पुण्यात बनावट नोटांची डिलिव्हरी देण्यासाठी पाठविले. विश्रामबाग पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या चौकशीत त्याच्या आणखी तीन साथीदारांना पकडून पोलिसांनी ५ लाख ६४ हजार रुपयांच्या नोटा व नोटा बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.

https://www.instagram.com/p/De9iTxrjYJD/?img_index=1

सलमान जैनद्दीन राजे Salman Jainuddin Raje (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड), शाफाज फिरोज अन्सारी Shafaz Firoz Ansari (वय ३०, रा. नालासोपारा, जि. ठाणे), विशाल विलास गलांडे Vishal Vilas Galande (वय ३७, रा. सुरुपखन वाडी, ता. माण जि. सातारा), अभिजित रावसाहेब कांबळे Abhijit Ravasahab Kamble (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शाफाज अन्सारी हा या टोळीचा प्रमुख आहे. त्याला गेल्या वर्षी बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नात सहकारनगर पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा हाच उद्योग सुरु केला. साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे त्याने बनावट नोटा तयार करण्याचा कारखानाच सुरु केला. त्या बनावट नोटांची डिलिव्हरी देण्यासाठी त्याने सलमान राजे याला पुण्यात पाठविले. तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने ही टोळी गजाआड झाली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन अहिवळे व शैलेश सुर्वे यांना माहिती मिळाली की, एक जण बनावट नोटा घेऊन महात्मा फुले मंडई येथे येणार आहे. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी पावणेपाच वाजता मंडईच्या पाठीमागील बाजूच्या म्हसोबा मंदिराच्या समोरील रोडवर सलमान राजे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या ४ लाख २ हजार ५०० रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळून आल्या. अधिक चौकशीत सलमान राजे याने त्याचे तीन साथीदार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सातारा, कोल्हापूर येथे जाऊन तिघांना अटक केली. शाफाज अन्सारी याच्या घरातून १ लाख ६१ हजार ५०० रुपयांच्या ५०० रुपये दराच्या ३२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय या नोटा बनविण्याचे साहित्य, प्रिंटर जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन कदम, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, शैलशे सुर्वे, समीर पवार, शशिकांत दरेकर, जाकीर मणियार, नितीन मुंढे, महेश कदम, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात, नितीन बाबर यांनी केली आहे.

You may have missed