Pune Crime News | हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याच्या आरोपावरुन पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | एमपीएससीचा अभ्यास करताना झालेल्या मैत्रीतून लग्न केले असताना पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर आपल्याला ४० लाख रुपये हुंडा देणार्‍या मुली सांगून होत्या,  असे सांगून माहेरुन फ्लॅटसाठी, चारचाकी कार हुंडा घेऊन येण्यास बोलून पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ करुन धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरुन पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल शेषराव राठोड Rahul Sheshrao Rathod  (वय २९, रा. मोहननगर, धनकवडी, मूळ रा. जयराम तांडा, पाचवेगाव सर्कल, ता. गेवराई, जि. बीड) आणि नणंदावा राजू पवार (रा. बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३१ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल राठोड हे सध्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सहकारनगर पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल राठोड आणि फिर्यादी यांची शनिवार पेठेतील अभ्यासिकेत एमपीएससीचा अभ्यास करीत असताना २०२२ ते २०२३ मध्ये ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घराच्यांनी लग्नास होकार दिला. फिर्यादी यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या तयारीच्या प्रवासामध्ये त्याला सर्वतोपरी मानसिक, आर्थिक, शारीरिक मदत केली. त्याचे मैदानी चाचणीमध्ये मसल टियर झाले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी वैद्यकीय उपचाराकरीता २ लाख २० हजार रुपयांची मदत केली. राहुल याची १ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता निवड झाली. त्याच्या गावाकडे मिरवणुक करीता त्याचे डिजेसाठी २० हजार रुपये फिर्यादीकडून राहुलचा भाऊ रोशन राठोड याने मागून घेतले.  (PSI Rahul Rathod)
)

या मिरवणुकीदरम्यान त्याचे नातेवाईकांमध्ये चर्चा चालू झाली की मुलगी आपल्या जातीची नाही. त्यावेळेपासून राहुल फिर्यादी पासून लांब राहु लागला. डिसेबंर २०२४ मध्ये तो गावी राहु लागला. त्याने फिर्यादी यांना सर्व सोशल मीडियावरुन ब्लॉक केले होते. २५ मे २०२५ रोजी राहुल याने फिर्यादी यांना सांगितले की, आपले नाते संपले आहे. घरचे मुलगी बघतील, त्यानुसार लग्न करणार आहे. घराच्यांचा  तर हुंडा किती घ्यायचा आहे, हे पण ठरलेले आहे, आता तु तुझ बंघ, असे म्हणून तो त्याचे घरी कायमचा निघून गेला. घरी गेल्यावर देवदर्शनासाठी जाण्यासाठी २० हजार रुपये पाठवुन देण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्याला पैसे पाठविले. त्यानंतर ऐश्वर्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार मागे घेण्यासाठी आणि लग्नाच्या आश्वासनानंतर राहुल याने लग्नासाठी २५ लाख रुपये, तर त्यानंतर ४० लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल याच्या प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेल्यानंतरही त्याने संपर्क मर्यादित ठेवला आणि त्याच्या नातेवाईकांकडून हुंड्यासाठी वारंवार विचारणा होत असे. राजू पवार हे तुमच्या बहिणीला किती हुंडा दिला होता, अशी विचारणा करत. राहुलने फोन उचलला नाही तरी  त्या राजू पवार यांना फोन करत. तेव्हा ते हुंड्याविषयी विचारणा करुन उडवाउडवीची उत्तरे देत असत, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर १२ सप्टेंबर २०२५ रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आळंदी येथील मंगल कार्यालयात त्यांचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतरही राहुलचे  वर्तन बदलले नाही. त्याने त्यांना सासरी नेले नाही, सणासुदीला योग्य वागणूक दिली नाही आणि भेटणे व बोलणे टाळले, असा आरोप आहे.

महिला आयोग आणि भरोसा सेलमध्येही याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. जून २०२६ मध्ये धनकवडीतील मोहननगर परिसरात दोघे एकत्र राहू लागल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घराचे भाडे, डिपॉझिट आणि घरखर्च अर्धा-अर्धा देण्याची मागणी राहुल याने केली. त्यानंतर चारचाकी गाडी घेऊन देण्यासाठी दबाव टाकला. ‘तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही’, असे बोलून अपमान केला. घटस्फोट घेण्यासाठी वारंवार दबाव टाकल्याचा आरोप आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री अन्य महिलेशी फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राहुल याने आपल्याला शस्त्र दाखवून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याने मारहाण केल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या घटनेनंतर त्या काही दिवस माहेरी राहिल्या होत्या. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी राहुल कार्यालयात जाताना मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून आरडाओरड करू लागला. ‘मला मारू नकोस, माझ्या अंगावर झटू नकोस, तुला लाज वाटली पाहिजे नवरा पोलीस अधिकारी आहे. तुला जेवण बनवायला जमत नाही, नवरा कपडे बाहेर धुवायला टाकतो,  असे म्हणत फ्लॅटबाहेर येऊन आरडाओरडा करु लागला. मला माझी बायको मारती आहे, डोक्यात फरक झालेला आहे, असे म्हणू लागला. शिवीगाळ केली. त्यावेळी शेजारी पाजारी आपल्याकडे बघू लागले. त्यावेळी आपल्याला कसे तरी वाटू लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राजेश खांडवे तपास करीत आहेत.

You may have missed