Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकार्‍यांचा पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांच्या हस्ते सन्मान (Video)

Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | Accomplished female police officers honored by Shri Mahalaxmi Mandir; the felicitation was conducted by Joint Commissioner of Police Sanjay Darade (Video)

पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलीस दलात महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी या कर्तृत्वामध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे राहून अहोरात्र झटत असल्याने नवरात्रोत्सवात अशा नारी शक्तीचा सन्मान करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, अशा शब्दात पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://www.instagram.com/p/DeegkqapYJL

सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आज कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकार्‍यांचा पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती भरत अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, युवराज लाहोटी, विशाल सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DeesbYWJMKZ

पोलीस सह आयुक्त संजय दराडे म्हणाले की, गेल्या २० वर्षांपासून पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आहे. पोलीस दलातील ड्युटी म्हणजे २४ तास दक्ष राहावे लागते. कधी कॉल येईल आणि पळावे लागेल, हे सांगता येत नाही. असे असतानाही महिला पोलीस अधिकारी पती, आई, मुलांचे सर्व सांभाळून विभागाचे कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्यासमोर मानसिक आणि शारीरीक आरोग्य सांभाळण्याचे मोठे आव्हान असते. डॉक्टरांची ओपीडी रात्री थांबते, पण, या महिला पोलीस अधिकार्‍यांचे काम २४ तास सुरु असते. त्या न डगमगता आणि खंबीरपणे काम करत असतात. म्हणून नवरात्रोत्सवात अशा जिजाऊ, सावित्रीबाई यांचा वारसा सांगणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची संधी श्री महालक्ष्मी मंदिर आणि अग्रवाल कुटुंबांनी दिल्याबद्दल आभार मानतो.

https://www.instagram.com/p/DeeLyXapIsL

विश्वस्त भरत अग्रवाल म्हणाले की, नवरात्रोत्सवात देवीचा जागर केला जातो. आमच्या समोर बसलेल्या या देवींचा गौरव करण्याची आम्हाला संधी मिळाली. महिलांच्या कर्तृत्वाला संधी मिळाली तर त्या पुरुषांनाही मागे टाकतात, असे दिसून आले आहे. आमच्या संस्थेमध्ये आता ६५ टक्के महिला अधिकारी, कर्मचारी वर्ग आहे.

https://www.instagram.com/p/DeduHhwpVQd

अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, नूतन पवार, नम्रता देसाई, स्वप्ना बोकील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक, अश्विनी सातपुते, माया देवरे, रुणाल मुल्ला, सुनिता नवले, प्रियंका गोरे, सहायक पोलीस निरीक्षक शरयु देशमुख, संजना काकडे तसेच वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला़

https://www.instagram.com/p/Deb06kAppcF

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज लाहोटी यांनी केले तर सुत्रसंचालन विशाल सोनी यांनी केले.

https://www.instagram.com/p/DebZ2WTJz9b

You may have missed