Pune Crime News | मतदार नोंदणी काम करण्यास नकार देऊन शासकीय आदेश धुडकाविणार्‍या शिक्षकावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | राज्यात निवडणुक आयोगाने विशेष मतदार यादी पुनर्परिक्षण (एस आय आर) ची मोहिम सुरु केली आहे. मतदार नोंदणी मोहिमेत शासकीय आदेशाचे उल्लंघन करुन काम करण्यास नकार देणार्‍या शिक्षकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र हरिचंद्र थोपटे Ravindra Harichandra Thopte (रा. आंबेगाव) असे या शिक्षकांचे नाव आहे. रवींद्र थोपटे हे आंबेगाव येथील प्रेरणा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. याबाबत तलाठी/ ग्राम महसूल अधिकारी अमोल बारहाते (वय ३२, रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुक आयोगाने २००२ च्या मतदार यादीतील मतदार २०२४ मधील मतदार यादीमध्ये आहेत अगर कसे याबाबत शहानिशा करुन हे मतदार कोणत्या मतदार केंद्रात मतदार आहे, याची पडताळणी करण्यासाठी थोपटे यांना (बुथ लेव्हल ऑफिसर) बीएलओचे काम देण्यात आले होते. शाळेतील दैंनदिन कामकाज सांभाळून हे काम करायचे होते. पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपुत यांनी रवींद्र थोपटे यांना लेखी आदेश दिला होता. तरीही त्यांनी बीएलओ चे अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन केले नाही़ किंवा त्यांना दिलेले काम पुढे कोणत्याही प्रकारे बी एल ओचे काम चालू केले नाही. त्यांनी काम पार पाडावे, यासाठी वरिष्ठांनी वेळोवेळी कळवूनही त्यांनी हे आदेश धुडकावून लावले. त्यामुळे शेवटी रवींद्र थोपटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एस आय आर तसेच जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांविरुद्ध या पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

You may have missed