Pune Crime News | फ्लॅट, दुकान खरेदीसाठी 1 कोटी 40 लाख घेऊन करार रद्द करायला लावून फसवणूक करणार्‍या वाय एस असोसिएट्सच्या योगेश साबळेंवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Case registered against Yogesh Sable of YS Associates for cheating by taking Rs 1 crore 40 lakh for purchase of flat, shop and forcing to cancel the contract

पुणे : Pune Crime News |  शिवाजीनगर येथील बनकर -साबळे हाईटस या ठिकाणी फ्लॅट व दुकान देण्याचा करार करुन १ कोटी ४० लाख रुपये घेतले. त्यानंतर मुळ जमीन मालकाशी वाद झाल्याने काम बंद पडल्याचे सांगून पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन करार रद्द केला. मात्र, पैसे परत न करता १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ७ दिवसात पैसे परत करण्याचा वादा करुन ५ वर्षानंतरही पैसे परत केले नाहीत.

याबाबत मुकेश फुलचंद अग्रवाल (वय ३६, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वाय एस असोसिएट्सच्या (YS Associates) योगेश दत्तात्रय साबळे Yogesh Dattatreya Sable (वय ४०, रा. ज्ञानदिप कॉलनी, कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ मध्ये कोथरुडमधील आनंदनगर येथे घडला होता. (Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे स्टिलचे दुकान होते. १० वर्षांपूर्वी ते बंद पडले. २०२० मध्ये अग्रवाल यांच्या मित्राचे चांदणी चौक येथील बिल्डिंगचा प्लॅन मंजूर करुन घ्यायचा होता. त्यावेळी अग्रवाल यांची योगेश साबळे यांच्याशी ओळख झाली. २०२१ मध्ये कोथरुडमधील आनंदनगर येथे ते भेटले. त्यावेळी योगेश साबळे यांनी त्याचे शिवाजीनगर महापालिका समोर साबळे हाईट्स नावाची साईट चालू आहे. त्याठिकाणी फ्लॅट व शॉप विक्रीसाठी उपलब्ध आहे. मी तुम्हाला कमी किंमतीला देतो, असे साबळे यांनी सांगितले. त्यांनी मित्राचे काम करुन दिले असल्याने त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला. शिवाजीनगर येथील साईटवर जाऊन पाहिले . तेथे पायासाठी खड्डे खणलेले दिसत होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅट व दुकानासाठी १६ नोव्हेबर २०२१ रोजी १ कोटी ४० लाख रुपये दिले. रजिस्टर दस्त नोंदणी करण्यात आली. त्यानंतर योगेश साबळे याने ज्यांच्याकडून प्लॉट विकसनासाठी घेतला होता. त्याचे मुळ मालक हेमंत रमेश बनकर व इतर यांच्यामध्ये वाद झाल्याने बनकर साबळे हाईट्स येथे चालू असलले काम बंद पडले असल्याचे सांगितले. तेव्हा योगेश साबळे यांनी आम्हाला त्याचे मुळ मालकाबरोबर वाद झालेले असून जर तुम्ही आपण केलेले खरेदी खत रद्द केले तर जागेचे मुळ मालक मला माझे पैसे परत देणार आहे, त्यानंतर ७ दिवसामध्ये तुम्हाला पैसे परत करतो, असे बोलला.

त्यांना खरेदीखत दस्त रद्द करण्यास सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दस्त रद्द केला. त्यावेळी योगेश साबळे याने प्रत्येकी ७० लाखांचे दोन चेक त्यांना दिले होते. आता माझ्या बँकेत पैसे नाहीत. आता बँकेत चेक टाकू नका, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वारंवार योगेश साबळे याला विचारले. तेव्हा त्याने नवीन खरेदी खत करुन देण्याबाबत विचारणा केली. मुळ मालकाबरोबर सेटलमेंट चालू आहे, आपले काम लवकरच होणार आहे, असे बोलत राहिला. शेवटी त्यांनी १९ एप्रिल २०२३ रोजी चेक बँकेत टाकले. ते बाऊन्स झाले. तेव्हा साबळे याने जुन मध्ये पैसे मिळणार आहे, तेव्हा तुमचे पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वारंवार कॉल केल्यावर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी शिवाजीनगर कोर्टामध्ये निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अ‍ॅक्टखाली दावा दाखल केला. त्यानंतर आता कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.

You may have missed