Pune Crime News | फ्लॅट विक्रीचा करार करुन ते परस्पर दुसर्‍यांना विक्री करुन 4.75 कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी रविनंदा लँडमार्क्सच्या समीर जैन, देवेश जैन यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Case registered against Sameer Jain, Devesh Jain of Ravinanda Landmark for cheating Rs 4.75 crores by making a flat sale agreement and selling it to others

पुणे : Pune Crime News | वाघोली येथील रवीनंदा स्काईलाईट्स (Ravinanda Skylights) या प्रकल्पात बाय बॅक स्किममध्ये फ्लॅट खरेदी करुन देतो, असे सांगून ४ कोटी ७३ लाख २३ हजार ५५४ रुपये घेऊन त्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी रविनंदा लँडमार्क्सच्या (Ravinanda Landmarks) भागीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मन्सूर कुतुबद्दीन पोलन (वय ६१, रा. सिंड्रेला अपार्टमेंट, साचापीर स्ट्रीट, कॅम्प) यांनी वाघोली पालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रविनंदा लँडमार्क्सचे भागीदार समीर रवींदलाल जैन (Sameer Ravindra Jain) आणि देवेश  रवींदलाल जैन (Devesh Ravindralal Jain) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२५ पासून आतापर्यंत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मन्सूर पोलन यांची मारिया रियल इस्टेट ही फर्म आहे. रविनंदा लँडमार्क्स  ही समीर जैन व दैवेश जैन यांची भागीदारी फर्म आहे. त्यांचे मार्केटयार्ड येथे मुख्य कार्यालय आहे. त्यांची पुणे शहरात वाघोली, कोंढवा, लुल्लानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ६ प्रकल्प सुरु आहेत. त्यात वाघोली येथील केसनंद फाटा येथे रविनंदा स्कायलाईटस प्रकल्प सुरु आहे. येथे एक, दोन बेडरुम चे फ्लॅट आहेत. या प्रकल्पातील १२ मजली इमारतीतील फ्लॅट देण्याचा वायदा करण्यात आला. या ठिकाणी समीर जैन व दैवेश जैन यांनी फिर्यादी मन्सूर पोलन यांना फ्लॅट खरेदीवर बाय बॅक स्किममध्ये फ्लॅट खरेदी करुन देतो, असे सांगितले. त्यानुसार २८ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांनी त्यांच्याकडून ४ कोटी ७३ लाख २३ हजार ५५४ रुपये घेतले. त्यांचा हा प्रकल्प २०१८ पासून टप्याटप्याने पूर्ण होत आहे. असे असताना फिर्यादी यांना देऊ केलेले फ्लॅट त्यांनी परस्पर दुसर्‍यांना विक्री केले. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांनी पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. शेवटी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्या तक्रार अर्जाची तपासणी केल्यानंतर वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता बेल्हेकर तपास करीत आहेत.

You may have missed