Pune Crime News | हॉटेल व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने 22 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर चतु:श्रृंगी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने  गुंतवणुकीसाठी २२ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या  एका महिलेसह दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विवेक मुकुंदराव आत्रे Vivek Mukundrao Atre (वय ४०), माया विलास साबळे Maya Vilas Sable (वय ३८, दोघे रा. रोहन गरिमा सोसायटी, सेनापती बापट रोड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रागिणी चेतन गुंजाळ (वय ३६, रा. गुंजाळवाडी, सेनापती बापट रोड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडारवाडी येथे २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजाळ यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा होता़ त्यासाठी लागणाऱ्या कर्जासाठी विवेक आत्रे व माया साबळे यांनी त्यांना ५ लाखांचे मॉर्गेज कर्ज मिळवुन दिले होते. या  प्रकरणातून रागिणी व चेतन गुंजाळ यांची  विवेक आत्रे व माया साबळे यांच्याशी ओळख झाली होती. विवेक आत्रे यांना दीप बंगला चौकाजव एक पान टपरी मिळाली. तिचे डिपॉझिट व रिपेरिंग साठी रागिणी यांनी ५ लाख रुपये दिले होते. पान टपरी व्यवस्थित चालत असताना त्यांनी त्याच्या शेजारील कुबेरा हॉटेल चालविण्यास घेतले. माया साबळे आणि रागिणी गुंजाळ यांच्या नावाने शॉप अ‍ॅक्ट लायसन्स काढण्यात आले.

हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष विवेक आत्रे व माया साबळे हिने दाखविले होते. गेल्या तीन ते चार वर्षांत आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी २२ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. हॉटेल व्यवसायात भागीदारी दिली नाही. रागिणी चेतन गुंजाळ यांनी आपण ओळखीच्या लोकांकडून हात उसने पैसे घेतले असल्याचे सांगून २२ लाख रुपये परत मागितले. सुरुवातीला पैसे आले की नक्की परत करणार, असे सांगून विवेक आत्रे हा त्यांना टोलवत राहिला. त्यानंतर  विवेक आत्रे याला पैसे मागितल्यावर त्याने शिवीगाळ केल. तसेच मी पैसे परत करणार नाही, कोणाला सांगायचे सांगा, मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी देत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

You may have missed