Pune Crime News | एक वर्षापासून फरार असलेल्या रेकार्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने केले जेरबंद

Pune Crime News | A notorious criminal with a police record, who had been absconding for a year, was apprehended by the team from Unit 2 of the Crime Branch.

पुणे : Pune Crime News | गंभीर दुखापत करुन गेल्या एक वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने तळजाई परिसरातून अटक केली.

शुभम भास्कर लोखंडे Shubham Bhaskar Lokhande (वय २३, रा. तळजाई पठार, मल्हार जिमशेजारी, धनकवडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

शुभम लोखंडे व त्याच्या साथीदारांनी एकावर शस्त्राने वार करुन गंभीर दुखापत केली होती. सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याशिवाय आंबेगाव पोलीस ठाण्यात या वर्षी त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंध गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शंकर कुंभार, सर्जेराव सरगर यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, शुभम लोखंडे हा फरारी गुन्हेगार तळजाई परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने तळजाई वसाहतीत सापळा लावुन त्याला पकडले़. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तो आंबेगाव पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्याला आंबेगाव पोलीस ठाण्यात हजर केले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय टकले, योगेश मांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, शिवानंद कायगुडे, सद्दाम तांबोळी, अजीम शेख, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, योगेश मांढरे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, ओमकार कुंभार, ऋषिकेश व्यवहारे, विनायक वगारे यांनी केली आहे.

You may have missed