Pune Crime News | भरदिवसा तरुणीला पळवुन नेण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला नागरिकांनी दिला चोप, यापूर्वीही त्याने अशी कृत्य केल्याची धक्कादायक माहिती आली समोर

Pune Crime News | Citizens beat up a scoundrel who tried to kidnap a young woman in broad daylight; shocking information has emerged that he had committed such acts before too

पुणे : Pune Crime News | मैत्रिणीची वाट पहात थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करुन तिला उचलून नेऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरुणी व तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने लोकांनी त्याला पकडून चोप दिला. ही घटना कात्रजमधील सुखसागरनगर येथील विद्यानगरमधील समर्थ डेअरी जवळ २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

https://www.instagram.com/p/De9R1qXJjpt

जितु किशोरीलाल सरोज Jitu Kishorilal Saroj (वय ३०, रा. हदगवा, ता. अख्तियार कोटाली, ता. भद्री कुंडा, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश, सध्या रा. विद्यानगर, कात्रज कोंढवा रोड) असे या नराधमाचे नाव आहे. त्याने यापूर्वी असाच प्रकार दोन तीन वेळा केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

याबाबत एका १८ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सायंकाळी साडेसहा वाजता कात्रज कोंढवा रोडवरील समर्थ डेअरी समोर मैत्रिणीची वाट पहात थांबली होती. त्यावेळी हा नराधम तेथे आला. त्याने या तरुणीचा शर्ट ओढून तिला उचलले. तिने आरडाओरडा केला. ते ऐकून तिची मैत्रिण धावत आली. तिने या नराधमाला जोरात धक्का दिला. तरीही त्याने तिला सोडले नाही. त्यावेळी दोघिंनी आरडाओरडा केला. तो ऐकून या मैत्रिणीची काकी व इतर जण धावुन आले. त्यांनी दोघांनी तरुणीला त्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या नराधमाने त्यातील एकाचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडला. तेथे लोक जमले. त्यांनी या नराधमाला पकडून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने या तरुणीला सोडले. कोणीतरी पोलिसांना फोन केल्यावर तातडीने पोलीस आले. त्यांनी या नराधमाला ताब्यात घेतले. त्याला कात्रज पोलीस चौकीत नेण्यात आले. या घटनेत या तरुणीच्या हाताला दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तपास करीत आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले की, आरोप जितु सरोज हा काहीही कामधंदा करत नाही. त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, तो काहीतरी व्हिडिओ पाहतो आणि असे काही विचित्र करतो. यापूर्वी त्याने असे २ -३ प्रकार केले होते. त्यावेळी त्याला मार बसला होता.

जितु सरोज याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर तातडीने चार्जशिट तयार करुन न्यायालयात हजर करणार आहोत.

You may have missed