Pune Crime News | दीड कोटींचा फसवणुकीच्या गुन्ह्यात 1 लाख बँक खात्यात घेणार्‍यास सायबर पोलिसांनी केली अटक

Pune Crime News | Cyber ​​police arrest man who took Rs 1 lakh into bank account in fraud case of Rs 1.5 crore

पुणे : Pune Crime News |  शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत चांगल्या मोबदल्याचे आमिष दाखवुन १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी १ लाख रुपये बँक खात्यात घेणार्‍याला सातारा येथून अटक केली आहे.

सुशांत हणमंत निकम Sushant Hanuman Nikam (वय ३८, रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी यांना टायकुन कॉईन कंपनी मार्फत कंपनीचे ट्रेडिंग अ‍ॅपवर गुंतवणुक केल्यास चांगला मोबदल्याचे आमिष दाखविले. त्यांना विविध बँक खात्यांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने रक्कमा भरायला लावून कोणताही परतावा न देता १ कोटी ४० लाख १६ हजार ३१५ रुपयांची फसवणूक केली होती.

या गुन्ह्याच्या  तपासात फिर्यादी यांच्या फसवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी १ लाख रुपये सुशांत निकम याच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळाली. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुशिल डमरे व त्याचे सहकारी यांनी सातारा येथे जाऊन आरोपीच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याला सातारा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईलमधून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शुभदा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, प्रविणसिंग राजपुत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, सतीश मांढरे, शितल डांगे, अनिकेत भिंगारे व सचिन शिंदे यांनी केला आहे.

You may have missed