Pune Pimpri Crime News | 3 वर्षाच्या बालकावर अत्याचार करुन गळा कापून खुन करणार्या अल्पवयीन मुलाला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे : Pune Pimpri Crime News | घरासमोर खेळत असलेल्या ३ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करुन त्याचा गळा कापून बॅगमध्ये भरून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. खुन करुन फरार झालेल्या अल्पवयीन मुलाला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन येथून अवघ्या १२ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
घराच्या समोर खेळत असलेला ३ वर्षाचा मुलगा अचानक गायब झाल्याने त्याचे आई वडिल शोध घेत होते. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली़ हा मुलगा तेथील शेजारील रुममध्ये मृतावस्थेत एका बॅग मध्ये आढळून आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाचे बारकाईने परिक्षण केले. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीच्या आधारे हा खुन अल्पवयीन मुलाने केला असून तो बिहारचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. हा मुलगा बिहारला जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुणे रेल्वे स्टेशन वरील बाहेरील बाजूस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्र्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक पिंजारी, जायभाये, पोलीस अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, चेतन सावंत, गोरख गाडीलकर, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, योगेश तिडके, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड यांनी केली आहे.
