Pune Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना डेक्कन पोलिसांनी केले जेरबंद; 7 कोयते जप्त

Pune Crime News | Deccan police caught 5 people preparing for a robbery; 7 knives seized

पुणे : Pune Crime News | एरंडवणा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर दरोड्याच्या तयारीने जमलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहेत.

रितेश गुरुनाथ चिप्पा Ritesh Gurunath Chippa (वय २५, रा. महात्मा फुले वाड्यासमोर, समता भूमी, गंजपेठ), विकास नितीन लांबोर Vikas Nitin Lambor (वय १९, रा. खिलारेवाडी), प्रतिक हनुमंत कांबळे Pratik Hanumant Kamble (वय १९, रा. गणेशनगर, एरंडवणे), प्रतिक रामचंद्र कदम ऊर्फ बाब्या Pratik Ramchandra Kadam alias Babya (वय २३, रा. खिलारेवाडी), सुजल मनोज मोरे Sujal Manoj More (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रचित काकडे आणि साहिल काळे (दोघे रा. खिलारेवाडी) हे पळून गेले आहेत. ही कारवाई एरंडवणे येथील अचानक मित्र मंडळ (चावडी) या बिल्डिंगच्या वरील मजल्यावर सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय ४५) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात फरारी गुन्हेगार, तडीपार गुन्हेगार यांचा डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस पथक सोमवारी सायंकाळी तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना एरंडवणे येथील एका बिल्डिंगमध्ये काही जण जमले असून ते दरोड्याची तयारी करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने या बिल्डिंगवर छापा घातला. पोलिसांनी तेथील ५ जणांना पकडले. त्या गडबडीत २ जण पळून गेले. त्यांच्याकडून ७ कोयते, २ काडेपटी, २ लायटर, लाल रंगाचा कापडी पट्टा, चटणी पावडर, ३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे तपास करीत आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे यांनी सांगितले की, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन छापा घालून ५ जणांना पकडले आहे. त्यांच्यातील एकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहेत. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर कोठे दरोडा टाकण्याची तयारी केली होती, याची चौकशी करण्यात येणार आहे.

You may have missed