Pune Crime News | ‘कॅफे पिटर’ हॉटेल ब्रँड दोघांना विकून ११ कोटी कमावून संचालक पळाला दक्षिण कोरियात, २ कोटींची फसवणुक करणार्या मुळ संचालकासह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | ‘कॅफे पिटर’ हा हॉटेलचा ब्रँड ५ कोटी रुपयांना विक्रीचा करार केला असताना, तो अधिकृतपणे रजिस्टर झाला असताना परस्पर दुसर्याला विक्री करुन त्याच्या फ्रेंचायझी देऊन ११ कोटींचा नफा मिळविला. कंपनीची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दक्षिण कोरियातील मुळ संचालकासह दोघांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चॅन सिओक जंग ऊर्फ पीटर जंग Chan Seok Jung aka Peter Jung (वय ५९, रा. प्लॅटिनयम ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी, मुळ रा. दक्षिण कोरिया), कमलेश मारुती काळे Kamlesh Maruti Kale (वय ३८, रा. कॅफे पीटर, गायकवाड पेट्रोलपंपाजवळ, औंध) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे.
याबाबत श्वेता सचिन साळुंखे (वय ३५, रा. विशालनगर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२२ ते आतापर्यंत बंडगार्डन येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रेलिफा हॉस्पिटॅलिटी एल एल पी व रेनबो लाइफ स्टाईल फॅक्टरी या कंपन्या आहेत. त्यांचा युमसिंग फुडवर्क प्रा. लि. या कंपनीच्या त्यात संचालिका असून २०२१ पासून त्या हॉटेल व्यवसाय चालवितात. त्यांचे कल्याणीनगर येथे कार्यालय आहे. त्यांच्या युमसिंग फुडवर्क कंपनीने कॅफे पिटर हा हॉटेल व्यवसायाचा ब्रँड रेलिफा फुडवर्क एल एल पीचे अंतर्गत नोंदणीकृत आहे़ कोरियन नागरिक चेंन सिओक जंग व पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे ५ कोटी रुपयांना ट्रान्सफर करुन घेतला आहे. हा ब्रँडचा ट्रेडमार्क १२ जुलै २०२४ पासून कॅफे पिटर युमसिंग फुडवर्क या कंपनीच्या नाव अधिकृत नोंदणीकृत आहे.
चॅन सिओक जंग याचा व्हिसा मुदत संपल्यामुळे त्याने ३१ मार्च २०२२ रोजी कॅफे पिटरचे तत्कालीन संचालक किरण शिंदे यांन रजिस्टर पॉवर ऑफ अॅटर्नी करुन दिली. चॅन सिओक जंग याचे कॅफे पिटर ब्रँड खरेदीपोटी त्यांनी २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपये दिले होते. सर्व फ्रेंचायझीची एन ओ सी व त्यांचे पेंडिंग पेमेंटस तसेच व्हेंडर एन ओ सी इत्यादी राहिलेला व्यवहार पूर्ण केल्यानंतर बाकी रक्कम देण्याचे ठरले होते.
फिर्यादी यांनी कॅफे पिटर ब्रँड खरेदी केला, तेव्हा पुणे शहरात २९ फ्रेंचायझी होत्या. २०२५ मध्ये फ्रेंचायझीचे अॅग्रीमेंट संपल्यानंतर २९ फ्रेंचायझीचे मालकांना पुढील अॅग्रीमेंटचे मिटिंगसाठी नोटीस पाठवून बोलावले होते. त्यावेळी फ्रेंचायझीधारक कमलेश काळे याने कॅफे पिटर हा ब्रँड चॅन सिओक जंग याच्याकडून १० लाख रुपयांना विकत घेतला असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी माहिती घेतली, तेव्हा चॅन सिओक जंग याने अॅक्सेलार स्पोर्टस अॅण्ड एंटरटेनमेंट या कंपनीसोबत असाइनमेंट डीड करुन कॅफे पिटर ब्रँड विक्री केली. अॅक्सेलार कंपनी व कमलेश काळे यांनी मिळून त्यांचे स्वत:ची आऊटलेट व इतर फ्रेंचायझी होल्डर कडून दमदाटी करुन रॉयल्टी वसुल करत आहेत. काही आऊटलेट तसेच इतर फ्रेंचायझी बंद पाडले.
युमसिंग फुडवर्क कंपनीकडे कॅफे पिटर ब्रँडचे कायदेशीर अधिकार आहेत. तसेच फिर्यादी यांची परवानगी न घेता नवीन आऊटलेट उघडून त्यांच्याकडून डिपॉझिट, ब्रँड फी, रॉयल्टी असे मिळून जवळजवळ ११ कोटी रुपये वसुल केले आहेत. तसेच चॅन सिओक जंग व कमलेश काळे यांनी २०२४ पासून निगडी, फिनिक्स मॉल, वाकड, कर्वेनगर, पुनावळे व कोथरुड या ठिकाणी कॅफे पीटरच्या बेकायदेशीरपणे फ्रेंचायझी उघडल्या असून त्यातून नफा कमवत आहेत. चॅन सिओक जंग याने एकाच वेळी दोघांना ब्रँड विकून तो दक्षिण कोरियाला निघून गेला आहे. जंग व कमलेश काळे यांनी २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक डांगे तपास करीत आहेत.
