Pune Crime News  । मजूरही बाळगू लागले पिस्टल ! मजुराकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केले पिस्टल, जिवंत काडतुसे

Pune Crime News | Even laborers have started carrying pistols! Police at Bharati Vidyapeeth seized a pistol from a laborer, live cartridges also recovered.

पुणे : Pune Crime News । शहरात येणार्‍या पिस्तुलांचा पुरवठा थांबावा, यासाठी पुणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील उमराठी गावात मोठी कारवाई करुन शस्त्रांचे कारखाने उध्वस्त केले होते. या कारवाईनंतर शहरातील अवैध शस्त्रांचा पुरवठा कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आता गुन्हेगार हे उत्तर प्रदेश, बिहारमधून शस्त्रे घेऊन येऊ लागली आहेत. बिगारी काम करणार्‍या एका तरुणाला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.

विशाल प्रल्हाद कलवले (वय २६, रा. ज्ञानेश्वरी हाईटस, भिलारेवाडी) असे या बिगारी काम करणार्‍या मजुराचे नाव आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व १ हजार रुपयांचे एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. त्याच्याबरोबर राहणार्‍या एका बिहारी मजुराचे हे पिस्टल असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक २९ जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, भिलारेवाडी येथील महानंद डेअरी जवळ एक जण थांबला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. या बातमीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला असता विशाल कलवले हा मिळून आला. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या सुचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.

You may have missed