Pune Crime News | गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमध्ये आवळल्या मुसक्या; तब्बल 9 महिन्यांनंतर अटक
पुणे : Pune Crime News | कोथरुडमध्ये गोळीबार करुन दहशत निर्माण केल्यानंतर गेल्या सप्टेंबरपासून फरार असलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने राजस्थानमधील सिकर येथून जेरबंद करण्यात यश मिळविले. गँगस्टर नीलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून त्याचा भाऊ सचिन घायवळ हा भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसल्याची माहिती होती. (Sachin Ghaiwal Arrested)
गुन्हे शाखेची पथके गेली काही महिने त्याचा माग काढत होती. युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व त्यांचे सहकारी यांनी गेले अडीच, तीन महिने त्याचा तांत्रिक विश्लेषण करुन त्याचा शोध घेत होती. गुप्त बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे सचिन घायवळ हा राजस्थानमधील सीकर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली (Nilesh Ghaiwal Gang). त्याबरोबर पोलीस पथक राजस्थानला रवाना झाले होते. त्यांनी काल सायंकाळी सचिन घायवळ याला सीकरमध्ये पकडले. त्याला आज सायंकाळी पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले. तपासी अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये याच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे.
