Pune Crime News | सहकारनगरमधील बंगल्यातून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सहकारनगर परिसरातील एका बंगल्यातून सुमारे दोन लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि त्यांचे कुटुंबीय संतनगर परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत.

घरातील शयनगृहात असलेल्या कपाटात सोन्याचे दागिने ठेवण्यात आले होते. हे दागिने चोरीला गेल्याचे नुकतेच निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत दोन लाख १३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

दागिने चोरणारी व्यक्ती घरातील अथवा परिसराची माहिती असलेली असावी, असा संशय तक्रारदार महिलेने फिर्यादीत व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत संघर्षी करत आहेत.

You may have missed