Pune Crime News | मोबाईलमधील चॅटींगबाबत विचारणा केल्याने पतीने पत्नीला लाकडी बॅटने मारहाण करुन गळा दाबून केला जीवे मारण्याचा प्रयत्न, क्वीन गार्डनमधील कुटुंबातील घटना

Pune Crime News | Husband beats wife with wooden bat and tries to strangle her to death after asking about chatting on mobile, incident in Queen Garden family

पुणे : Pune Crime News |  मोबाईलमधील चॅटींगबद्दल विचारणा केल्याच्या रागातून पतीने पत्नी व मुलाला लाकडी बॅटने मारहाण केली. पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या भितीने पत्नी माहेरी निघून गेली असून अहिल्यानगर पोलिसांकडे तिने फिर्याद दिली आहे.

विजय धुलचंद कारंडे Vijay Dhulchand Karande (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना क्वीन्स गार्डनमधील घरी ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कारंडे हे त्यांची पत्नी व मुलासह क्वीन्स गार्डन येथे राहतात. त्यांच्या मोबाईलमधील चॅटिंगबाबत त्यांच्या पत्नी रुपाली यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. त्यामुळे त्यांना राग आला. यावेळी झालेल्या वादावादीत त्यांनी लाकडी बॅटने फिर्यादी पत्नी व मुलाला बेदम मारहाण केली. पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली. त्यानंतर त्या अहिल्यानगर येथील आपल्या माहेरी निघून गेल्या. तेथे त्या उपचार घेत आहेत. तेथून त्यांनी आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी हा गुन्हा पुण्यात घडला असल्याने तो कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed