Pune Crime News | दौंड तालुक्यात हृदयद्रावक घटना; 9 वर्षांच्या मुलीची वडिलांकडून हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग

Pune Crime News | Heartbreaking incident in Daund taluka; 9-year-old girl murdered by father, house set on fire to destroy evidence

Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील घटनेची चर्चा सुरू असतानाच दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे आणखी एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या ९ वर्षांच्या मुलीची वडिलांनीच निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम दुर्योधन चव्हाण (वय ३३) यांनी आपली मुलगी अनामिका हिने भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात घरातील लाकूड कापण्याच्या मशीनने तिच्या गळ्यावर, डोक्यावर आणि गालावर वार करून हत्या केली.

या अमानुष कृत्यानंतरही आरोपी थांबला नाही. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावली. ही घटना ३ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे सव्वा तीन वाजता घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

या प्रकरणी दौंड पोलिसांनी वडिलांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

You may have missed