Pune Crime News | मेडिकलच्या विद्यार्थिनीची दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

Pune Crime News | Medical student commits suicide by jumping from the tenth floor

पुणे : Pune Crime News | कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीमधील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षाच्या तरुणीने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे़

आदिमाया शेखर रेड्डी (वय २१, रा. नॅन्सी लेक होम सोसायटी, कात्रज, मुळ रा. तिरुमलंगरी, हैदराबाद, तेलंगणा) असे या तरुणीचे नाव आहे. आदिमाया रेड्डी ही एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होती. ती भावाबरोबर कात्रज येथील एका फ्लॅटमध्ये राहत होती. परीक्षेचा ताण आल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या भावाने दिली.

अभ्यासाचे ओझे आणि परीक्षेचा प्रचंड ताण तसेच वाढत्या अपेक्षा याचा ताण सहन न झाल्याने आदिमाया हिने ती राहत असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीला रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता.  पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

You may have missed