Pune Crime News | आदित्य मुसळेशी भांडणे केल्याच्या रागातून टोळक्याने दोघांवर केला तीक्ष्ण शस्त्राने वार; मांजरीतील पेट्रोल पंपावरील घटना
पुणे : Pune Crime News | आदित्य मुसळेबरोबर भांडणे का केलीस, असे बोलून टोळक्याने दोघा तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विशाल हनुमंत सोनवणे (वय २४, रा. कुंजीर वस्ती, मांजरी) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रेम परकाळे, धैयशील आखाडे व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीतील समर्थ पेट्रोल पंपाजवळ ६ जून रोजी रात्री ९ वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सोनवणे आणि आदित्य मुसळे यांच्यात चार पाच दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. विशाल सोनवणे हा त्याचा मित्र सोन्या याच्याबरोबर पेट्रोल भरण्यासाठी समर्थ पेट्रोल पंपावर रात्री गेला होता. पेट्रोल भरुन बाहेर पडल्यावर प्रेम परकाळे व त्याचे मित्र आले. त्यांनी विशाल सोनवणे याला अडविले. ‘‘तू आदित्य मुसळे याच्याबरोबर भांडणे का केलीस’’असे बोलून त्यांनी विशाल व त्याचा मित्र सोन्या यांना हाताने मारहाण केली. त्यांच्याकडील तीक्ष्ण हत्याराने विशाल याच्या मनगटावर वार करुन जखमी केले. सोन्या याच्या तोंडावर मारहाण करुन जखमी केले. आदित्य मुसळे याच्या सांगण्यावरूनच ही मारहाण केल्याचा विशाल सोनवणे याला संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब डिगोळे तपास करीत आहेत.
