Pune Crime News | पुणे : 23 वर्षाच्या पोलिसाच्या मुलाचे अल्पवयीन मुलासोबत अश्लिल कृत्य; भवानी पेठ पोलीस वसाहतीत एकच खळबळ
पुणे : Pune Crime News | पोलिसाच्या मुलाने पोलीस वसाहतीतील एका खोलीत अल्पवयीन मुलाला नेऊन त्याच्यासोबत अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस वसाहतीत इतके घाणेरडे कृत्य प्रथमच झाल्याची भावना भवानी पेठ पोलीस वसाहतीतील पोलिसांनी व्यक्त केल्या.
समर्थ पोलिसांनी शुभम अरुण गोरे Shubham Arun Gore (वय २३, रा. भवानी पेठ पोलीस वसाहत) याला अटक केली आहे. ही घटना भवानी पेठ पोलीस वसाहतीत ९ मे रोजी रात्री साडेसात वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम गोरे हा एका पोलिसाचा मुलगा आहे. त्याने अल्पवयीन मुलाला तुला काहीतरी दाखवायचे आहे, असे सांगून घरामध्ये घेऊन गेला. त्याला बेडवर बसवुन घराच्या दरवाज्याची आतून कडी लावून घेतली. त्यानंतर या मुलासोबत अश्लिल कृत्य केले. घरातून बाहेर जात असताना “तू जर घरी कोणाला काही सांगितले, तर तुला बघतोय,” अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने त्यादिवशी याबाबत कोणाला सांगितले नाही. त्यानंतर दोन दिवसांनी त्याने ही बाब आपल्या पोलीस असलेल्या वडिलांना सांगितली. त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समर्थ पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तपास करीत आहेत.
