Pune Crime News | पुणे : अक्षय मस्के याच्यावर गोळीबार करणार्या 5 जणांना अटक; एकविरा देवीच्या डोंगरावरुन घेतले ताब्यात; गँगस्टर बंडु आंदेकरसह 12 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीचा भाऊ अक्षय ऊर्फ बाळु बापू मस्के (वय २६) याच्यावर गोळीबार करुन त्याच्यावर वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करणार्या ६ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने कार्ला येथील एकविरा देवीच्या डोंगरावरुन ताब्यात घेतले.
आफ्ताफ शरीफ सय्यद Aftaf Sharif Syed (रा. भाग्यदेवनगर, वैशाली नर्सिंग होम, कोंढवा खुर्द), ऋषी प्रसाद मोहन आंबट Rishiprasad Mohan Ambat (वय २१, रा. चुडामण तालीमजवळ, नाना पेठ), आवेज अशपाक शेख Awez Ashpak Shaikh (वय २६, रा. गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे Vedanta Srinivas Temgire (वय १९, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), अमन फारूक बागवाले Aman Farooq Baghwale (वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अक्षय मस्के हा अजूनही बेशुद्धावस्थेत असून भारती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
अक्षय मस्के याच्यावर गोळीबार झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील विविध युनिट आरोपीच्या शोधाचा प्रयत्न करु लागले. पोलिसांना त्यातील काही आरोपींची नावे समजली. पोलिसांनी ऋषी आंबट याच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी ही मुले आदल्या दिवशी कार्ला येथील एकविरा देवीला गेले होते. ते आताही एकविरा देवीला गेले असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांचे पथक कार्ला येथे पोहचले. त्यांनी एकविरा देवीच्या डोंगरावर शोध घेऊन ६ जणांना ताब्यात घेतले.
अक्षय मस्के याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याची पत्नी करुणा अक्षय मस्के (वय २२, रा. स्वामी समर्थनगर, आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गँगस्टर बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर, तुषार निरंजन वाडेकर (Tushar Niranjan Wadekar), स्वराज निरंजन वाडेकर (Swaraj Niranjan Wadekar), स्वप्नील बहादुरकर (Swapnil Bahadurkar) यांच्यासह १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
बंडु आंदेकर व इतरांनी संगनमत करुन वनराज आंदेकर यांच्या खुनाचा सुड घेण्यासाठी कट रचला. वनराज आंदेकर यांचा खुन करण्यासाठी पिस्तुल पुरविल्याबद्दल आकाश मस्के याला पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. त्याचा भाऊ अक्षय मस्के हा रिक्षा चालवतो. तो रिक्षा घेऊन बालाजीनगर येथील राजश्री शाहु बँक चौकात बुधवारी २० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. अक्षय मस्के याला तातडीने भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून अजूनही तो बेशुद्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
