Pune Crime News | पुणे : उत्तमनगर येथील 22 गुंठे जमीन खरेदीसाठी नोंदणी करुन दीड कोटी रुपये घेऊन जमीन परस्पर दुसर्‍याला विक्री करुन फसवणूक करणार्‍या सुरेश दांगटसह 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  उत्तमनगर येथील २२ गुंठे जमीन विक्री करण्यासाठी नोंदणी करुन ती जमीन दुसर्‍याला परस्पर विक्री करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश दांगट यांच्यासह ८ जणांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

छाया सुरेश दांगट Chhaya Suresh Dangat (वय ५३), सुरेश विश्वनाथ दांगट Suresh Vishwanath Dangat (वय ५६, रा. दांगट पाटीलनगर, कामठे वस्ती, एनडीए रोड, उत्तमनगर), भाग्येश सुरेश दांगट Bhagyesh Suresh Dangat (वय ३२), सुप्रिया मंगेश जावळकर Supriya Mangesh Javalkar (वय ३५), धनश्री योगेश मारणे Dhanashree Yogesh Marne (वय ३३, सर्व रा. उत्तमनगर), सुधीर विठ्ठल निवळकर Sudhir Vitthal Niwalkar (वय ५०, रा. शिवणे, उत्तमनगर), सानिध्या सुधीर निवळकर Sanidhya Sudhir Nivalkar (वय ३०), अथर्व निवळकर (वय २७, सर्व रा. शिवणे, उत्तमनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन संजय पाटील (वय ३९, रा. सपकाळ सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उत्तमनगरमधील दागंट पाटील नगर येथील घरी तसेच शेतावर १९ मार्च २०२१ पासून आतापर्यंत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश विश्वनाथ दांगट यांच्या नावे असलेल्या जमिनीचे छाया दांगट यांनी बनावट नोटरी दस्तऐवज तयार केला. फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व ऑनलाईन स्वरुपात १ कोटी ५० लाख २५ हजार १०० रुपये घेतले. या सर्व आरोपींनी मिळून संगनमताने खोटे बनावट नोटरी दस्त फिर्यादी यांना तयार करुन दिले. फिर्यादी यांनी २२ गुंठे जमीन खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी वकिलांमार्फत जो दस्त केला होता. तो दस्त आरोपींनी स्वत:चे सह्या, अंगठे व फोटो लावून वकिलांकडे दिला होता. तो दस्त आरोपी भाग्येश दांगट व सुधीर निवळकर यांनी परस्पर फिर्यादी यांची संमती न घेता स्वत:कडे ठेवून घेतला. तसेच आरोपी छाया दांगट यांनी फिर्यादी यांना नोटरीमध्ये नमूद केलेली जमीन विक्री न करता अभिजित दांगट, अरविंद सोमाणी तसेच राकेश पोखरणा, किरण वांजळे या लोकांना जमीन परस्पर विक्री केली. फिर्यादी यांनी जमीन खरेदीखतासाठी दिलेली १ कोटी ५० लाख २५ हजार १०० रुपये परत न करता आरोपींनी गैरफायदा घेऊन अपहार करुन घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करीत आहेत.

You may have missed