Pune Crime News | पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा दाखल, परवागनी नाकारली असताना केला कार्यक्रम
पुणे : Pune Crime News | दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लिल नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी होणार्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. असे असताना कार्यक्रम करणार्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील (Radha Patil Dancer) यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, आयोजकावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे (Empire Group A K Boys) अध्यक्ष भुषण अभिमान सोनवणे Bhushan Abhiman Sonavane Katraj (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, भाग १, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे Amol Kate Katraj (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांचीही गौतमी पाटील प्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुहे त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त लावणी सादर करण्यासाठी गावोगावी बोलविले जाते.
याबाबत पोलीस हवालदार नंदलाल हरिचंद्र भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवासाठी एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण सोनवणे यांनी लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी परवानगी मिळण्यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विषयाबाबत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ यांचे रंगभूमी मंडळांची कार्यपद्धती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चितीबाबत व त्याप्रमाणे मंडळाचे कार्य चालणे बाबत पोलीस प्रशासनाला पत्र मिळाले होते. या पत्रान्वये भूषण सोनवणे यांना कार्यक्रमाचे अनुषंगाने विहीत नमुन्यामध्ये परवानगीसाठीची कागदपत्रे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणार्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.
असे असताना दहिहंडी उत्सवाच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक गरड व त्यांचे सहकारी मंडळांना भेटी देत होते. एम्पायर ग्रुप ए के बॉइज या मंडळाला परवानगी नाकारली असताना ६ सप्टेंबर रोजी रात्री कार्यक्रम आयोजित करुन आदेशाचा भंग केल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष, आयोजक व लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
