Pune Crime News | पुणे : घर बांधून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: Case filed against a construction businessman for cheating by promising to build a house

पुणे : Pune Crime News |  खराडी येथील जमिनीवर घर बांधून देण्याचे आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकाकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिक राजेंद्र गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय मेथाजी बोरकर (वय ५९, रा. विद्यानगर, टिंगरेनगर, धानोरी) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने केलेल्या आरोपावरून  पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक राजेंद्र रामचंद्र गांधी Rajendra Ramchandra Gandhi (रा. रिजेंट प्लाझा, बाणेर पाषाण लिंक रोड, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर येथील रिजेंट प्लाझा येथील कार्यालयात जून २०२५ ते ११ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गांधी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या कंपनीचे बाणेरमधील रिजेंट प्लाझा येथे कार्यालय आहे. संजय बोरकर यांची खराडी येथे जागा आहे. त्या ठिकाणी घराचे बांधकाम  करुन देतो, असे सांगून राजेंद्र गांधी यांनी त्यांच्याकडून तब्बल ३५ लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतरही त्यांनी गेल्या वर्षभरात कोणतेही बांधकाम केले नाही. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. शेवटी बोरकर यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या कार्यालयात जाऊन पैसे परत मागितले. तेव्हा राजेंद्र गांधी याने त्यांना पैसे परत मागितले तर संपवून टाकण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आला आहे. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संजय बोरकर यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानंतर फिर्यादीने केलेल्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे तपास करीत आहेत.

▲ Sensitive Content | News & Awareness

Disclaimer: This content is shared solely for news reporting and public awareness. The allegations mentioned are based on claims made by the complainant and have not been independently verified. The concerned parties’ response is awaited.