Pune Traffic Updates | पुणे : वाघोलीत 22 सप्टेंबरला गणेश विसर्जन; पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल

Pune Traffic Updates | Pune: Ganesh Visarjan in Wagholi on 22nd September; major changes in traffic on Pune-Ahilyanagar road

पुणे : Pune Traffic Updates | वाघोली परिसरातील बहुतांश गणेश मंडळांचे नवव्या दिवशी विसर्जन होत असल्याने पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने वाघोली परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

ही वाहतूक व्यवस्था 22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 23 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

खासगी ट्रॅव्हल बस, कामगार बस आणि जड वाहनांसाठी
पुण्यातून नगर रोडमार्गे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसने
सदलबाबा चौक – चंद्रमा चौक – विश्रांतवाडी – आळंदी – शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.

नगर रोडने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसने
शिक्रापूर – चाकण – मुंबई या मार्गाचा वापर करावा.

नगर रोडमार्गे पुणे शहरात येणाऱ्या बसने लोणीकंद येथून
थेऊर फाटा – केसनंद गाव – थेऊर – सोलापूर रोड या मार्गाचा वापर करावा.

हलक्या चारचाकी वाहनांसाठी

अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनी
थेऊर फाटा – लोणीकंद गाव – केसनंद – थेऊर गाव – थेऊर फाटा – सोलापूर रोड या मार्गाने इच्छित स्थळी जावे.

पुण्याकडून शिरूर आणि अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वाघेश्वर चौकातून डावीकडे वळून भावडी गावामार्गे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सुरभी माथा, लोणीकंद येथे पोहोचून पुढे इच्छित स्थळी जावे.

नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा आदेश डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी जारी केला आहे.

You may have missed