Pune Crime News | पुणे : महापालिकेची बनावट कागदपत्रे तयार करुन इमारत बांधून त्यातील फ्लॅट विकल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्टवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: Case registered against a real estate developer and an architect for constructing a building using forged municipal corporation documents and selling the flats within it.

पुणे : Pune Crime News | विकसन करारनामा करुन कुलमुखत्यार पत्र घेऊन पुणे महानगरपोलिकेचे बांधकामाचे बनावट कागदपत्रे व परवानग्या  खर्‍या असल्याचे भासवुन इमारत बांधून त्यातील फ्लॅट विक्री करुन जमीनमालक, शासनाची व वित्तीय संस्थांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निलेश मारुती शिंदे (वय ४३, रा. वनश्री अ‍ॅमेनोरा रोड, हडपसर) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास जोन्ना लगड्डा Srinivas Jonna Lagadda (वय ४९, रा. प्रणयराज हेरिटेज, टिंगरेनगर) आर्किटेक्ट रोहीत लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगावमधील साठे वस्ती येथील मिळकतीबाबत ६ ऑगस्ट २०२० ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिंदे यांची लोहगावमधील साठे वस्ती येथे ३१५३ चौरस फुट जागा आहे. बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास लगड्डा यांनी या जागेच्या विकसन करारनामा करुन कुलमुखत्यारपत्र घेतले़ लगड्डा यांनी पुणे महानगर पालिकेचे बांधकामाचे बनावट कागदपत्रे व परवानग्या खरे असल्याचे भासवले. तसेच शासकीय खोटे शिक्के व मोहर तयार केले. फिर्यादी यांच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले.

या इमारतीमधील फ्लॅट विकून फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत आर्किटेक्ट रोहीत लोंढे यांनी त्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींनी हेच बनावट आदेश फ्लॅटच्या खरेदी विक्री करारनाम्याला जोडून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले व महाराष्ट्र शासनाची फसवणुक केली. आरोपींनी याच बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांची व वित्तीय संस्थांचीही फसवणूक केलेली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस एम खांडेकर तपास करीत आहेत.

You may have missed