Pune Crime News | पुणे : “मै इधर का भाई हूँ, कोई बीच में आया तो ऊपर भेज दूंगा!” तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वयंघोषित ‘भाई’ला अटक

Pune Crime News | Pune: “I am the brother here, if anyone comes in the way, I will send him upstairs!” Attempt to kill a youth by beating him with an iron rod; Self-proclaimed 'brother' arrested

पुणे : Pune Crime News |  पेटिंग काम करण्यासाठी घरातील लोक उठले आहेत का, हे पाहण्यासाठी आलेल्याला मोबाईल चोरल्याच्या संशयावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन गुन्हेगाराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भाई म्हणवुन घेणार्‍याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

अमन आनंद घलोत Aman Anand Gahlot (वय ३१, रा. रामनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत संदिप आनंद सोनवणे (वय ४३, रा. जयजवाननगर, येरवडा) यांनी लक्ष्मीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील रामनगर येथील गेहलोत चौकात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप सोनवणे हे पेंटिंगचे काम करतात.

रामनगर येथील एका घरात पेंटिंगचे काम करायचे होते. त्यासाठी त्या घरातील लोक उठले की नाही हे पाहण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी अमन घलोत याने हा मोबाईल चोरीला आला असा संशय घेतला. त्याने संदीप सोनवणे यांना  रस्त्यात अडवुन ‘मेरा मोबाईल किधर  है, तुही चुरा के भागा ना साले’ असे म्हणून शिवीगाळ केली. ‘मेरा मोबाईल मेरे को दे, नही तो आज तुझे उपर भेज दुंगा’ असे म्हणून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अमन याने संदीप सोनवणे यांच्या डोक्यात, खांद्यावर, दोन्ही हातावर लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. तेव्हा अमन याने लोखंडी रॉड हवेत फिरवुन ‘‘मै इधर का भाई हू, कोई  साला बिच मे आया तो उसे भी उपर भेज दुंगा,’’ असे मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलिसांनी अमन घलोत याचा शोध घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ९ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करीत आहेत.

You may have missed