Pune Crime News | पुणे : मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याचा आरोप करुन खंडणी उकळणार्या पाच जणांना खराडी पोलिसांनी केले जेरबंद; खंडणी दिल्यास वेश्या व्यवसाय करण्यास सपोर्ट करुन पोलिसांचे आम्ही पाहून घेण्याचे दिले आश्वासन
पुणे : Pune Crime News | स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करुन २ लाख रुपये खंडणी मागून त्यापैकी ३० हजार रुपये जबरदस्तीने त्यांनी स्पा मालकिणीकडून घेतले होते. दुसर्या दिवशी १ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या तिघांना खराडी पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्या चौकशीतून आणखी २ महिलांना शुक्रवारी दुपारी अटक केली आहे.
प्रतिक जयवंत गायकवाड Pratik Jaywant Gaikwad (वय ३१, रा. कामराजनगर, येरवडा व लांडोबा वस्ती, केसनंद वाडेगाव रोड, केसनंद), विशाल अशोक साळवे Vishal Ashok Salve (वय ४०, रा. शंकरराव जाधवनगर, विश्रांतवाडी), रोहित नागनाथ मांढरे Rohit Nagnath Mandhare (वय ३२, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह इतर दोन महिलांना देखील अटक करण्यात आली आहे. ही घटना खराडी येथील सिटी व्हिस्टा बिल्डिंगमधील फिलचट स्पा येथे १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. छाया कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या असून सुनिता लोंढे या सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
याबाबत ३८ वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फिलटच स्पा हे मसाज सेंटर सिटी व्हिस्टा बिल्डिंगमध्ये आहे. तेथे १३ मे रोजी सायंकाळी पाच जण आले. त्यांनी फिर्यादींना या स्पामध्ये वेश्या व्यवसाय करत. असे बोलून दमदाटी केली. तसेच तिच्या विरुद्ध पोलीस केस करण्याची धमकी दिली. पोलीस केस न करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी एवढे पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यातील महिलांनी फिर्यादी यांच्या डोक्याचे केस धरुन ओढून हाताने कानाजवळ, गालावर चापटा मारुन मारहाण केली. शेवटी तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ३० हजार रुपये त्यांनी जबरदस्तीने मोबाईलवरुन ट्रान्सफर केले. नंतर फिर्यादी यांचे दुकानामध्ये वेश्या व्यवसाय करु शकते. त्या कामी ते सर्व जण सपोर्ट करतील. तसेच पोलीस आले तर त्यांना कॉल लावून देणे व पोलिसांचे काय असेल तर ते पाहुन घेतील, असे सांगितले. उर्वरित ठरलेल्या खंडणीच्या रक्कमेपैकी १ लाख रुपये आणून देण्यासाठी त्यांना कोरेगाव पार्क येथे बोलावले. त्यासाठी त्यातील महिलेने तिचा मोबाईल नंबर देऊन ठेवला होता.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी खराडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. १४ मे रोजी कोरेगाव पार्क येथे सापळा रचला. या महिलेकडून खंडणी घेण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून दोन महिलांना शुक्रवारी १५ मे रोजी दुपारी अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक बिडवे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
