Pune Crime News | पुणे पोलिसांचे ‘मिशन क्रॅकडाऊन’: दोन गावठी पिस्तूलांसह दोघे ताब्यात

Pune Crime News | Pune Police's 'Mission Crackdown': Two Held with Homemade Pistols

पुणे : Pune Crime News |  गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ विशेष पथकाने चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रांविरोधात कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई लालू कऱ्हे (9925) आणि हरिप्रसाद पुंडे (2778) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने वडगावशेरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत आकाश उर्फ गजा अशोक मोरे (Akash alias Gaja Ashok More) आणि उज्ज्वल विनोद नव्हे (Ujjwal Vinod Navhe) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांकडून प्रत्येकी एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत राउंड असा एकूण दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राउंडचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आर्म्स ॲक्टअंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई API गोरक्षनाथ खरड आणि PSI नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस हवालदार सुशील बेंद्रे, गणेश इथापे तसेच पोलीस शिपाई लालू कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे, विलास केदारी, अमोल सरतापे आणि शुभम चिनके यांनी सहभाग घेतला.

You may have missed