Pune Crime News | पुणे : ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीच्या खुनाचा मारेकरी सापडला; पैशाच्या वादातून तरुणीचा गळा दाबुन टाकले होते मारुन
पुणे : Pune Crime News | केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत तरुणीचा गळा दाबून तिचा खुन करुन तिला फेकून दिलेल्या प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी एका कॅबचालकाला अटक केली आहे.
गोरखनाथ देवराम शिंदे Gorakhnath Devram Shinde (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे या कॅबचालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खुन झालेल्या तरुणींचे नाव आहे.
केशवनगर कचरा डेपोजवळील रोडवर बुधवारी रात्री उशिरा एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शवविच्छेदनात गळा दाबल्याने तिचा मृत्यु झाल्याचे म्हटले होते. त्यावरुन मुंढवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
मृतदेह सापडला, त्याच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नव्हते. पोलिसांनी तेथे येणार्या जाणार्या रोडवरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यातून एक कॅब संशयास्पद वाटली. त्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ६च्या पथकाने या कॅब चालकाचा शोध घेऊन त्याला पकडले़ त्याने गुन्हा कबूल केला.
आफरीन पठाण ही ब्युटी पार्लरचे काम करत होती. या कामासाठी जाण्यायेण्यासाठी ती गोरखनाथ शिंदे याच्या कॅबमधून जात होती. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. तिने गर्भपात करण्यासाठी शिंदे याच्याकडे १ लाख रुपये मागितले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागला. तिने त्याच्या घरी सांगण्याची धमकी दिली होती. स्वत:च्या घरी व बायकोला कळेल, या भितीपोटी शिंदे याने ५ मे रोजी रात्री पावणे नऊ वाजता आफरीन हिला खराडी बायपास रिलायन्स मॉल घेऊन गाडीत बसवुन खराडी मार्गे, आव्हाळवाडी येथे घेऊन गेला. तो ५० हजार रुपये घेऊन गेला होता.
या कारणावरुन त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने तिचा गळा दाबून तिला मारुन टाकले. तिला गाडीत घालून तो खराडी पासून केशवनगर मार्गे रोडने येताना कचरा डेपोच्या जवळ त्याने तिचा मृतदेह टाकून दिला. केशवनगर मार्गे, तो मुंढवा चौकातून चंदननगर मधील कामगार वसाहत येथील घरात आला, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असून तो सांगतो, त्या बाबी पडताळून पाहण्यात येत आहे.
