Pune News | महिला व बालसुरक्षेसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालयाला निवेदन
पर्वती आणि नसरापूर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
पुणे : Pune News | राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे विविध गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्यात आले.
पर्वती परिसरातील मुलींवरील अत्याचाराच्या प्रयत्नांच्या घटना तसेच नसरापूर येथील अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, पीडितांना न्याय मिळावा आणि महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यात यावी, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
हे निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशानुसार, युवा नेतृत्व बिपीन भाऊ कटारे आणि पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय भाऊ वाघमारे (पुणे जिल्हा संघटक) यांच्या तर्फे देण्यात आले.
यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करत, “महिला सुरक्षा, बालसुरक्षा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई हीच आजची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
तसेच “न्यायासाठी लढा सुरूच राहील,” असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते :
प्रीती ताई जगताप
प्राजक्ता ताई शिंदे
मनीषा ताई होणावळे
सुनील भाऊ करंजे
कुणाल भाऊ चव्हाण
तन्मय वाघमारे
सनी वाघमारे
रोहन यादव
अनिकेत बाराते
