Pune Crime News । पुणे : लग्नास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर केला हल्ला ! कर्वेनगरमधील दुधाणे लॉन्स परिसरातील घटना, तरुणी जखमी

Pune Crime News | Pune: Young man attacks woman after she refused to marry him! Incident in Dudhane Lawns area of Karvenagar, woman injured

पुणे : Pune Crime News । एकाच बँकेत काम करणार्‍या दोघा तरुण तरुणींमध्ये ओळख निर्माण झाली होती. तरुणाने तरुणींला लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र तिने त्याला नकार दिला. याचा राग मनात धरुन तरुणाने या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करुन तिला जखमी केले आहे.

याबाबत एका २३ वर्षाच्या तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश शरद रोकडे Ganesh Sharad Rokade (वय २८, रा. आकाशनगर, वारजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील डी पी रोडवरील दुधाणे लॉन्स  परिसरात ३० जुलै २०२६ रोजी रात्री सव्वा आठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी गणेश रोकडे हे एकाच बँकेत काम करतात. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यात एकमेकांशी बोलणे होत असत. दोघांचा परिचय झाल्यानंतर गणेश रोकडे याने या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. त्यावर तिने लग्नास नकार दिला होता. हा राग गणेश रोकडे याच्या मनात होता. ३० जुलै रोजी सायंकाळी बँक सुटल्यावर गणेश रोकडे हा त्या तरुणीला मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून दुचाकीवरुन तिला दुधाणे  लॉन्स  येथे घेऊन आला. तेथे त्यांच्यात  बोलाचाली झाली. तेव्हा रागाच्या भरात गणेश रोकडे याने त्याच्याकडील धारदार शस्त्र बाहेर काढून तिच्यावर वार केले . या तरुणीच्या हनुवटी व हातावर वार लागल्याने ती जखमी झाली. तेव्हा गणेश रोकडे हा तेथून पळून गेला. या तरुणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून गणेश रोकडे याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.

You may have missed